भारती विदयापीठ पोलीस स्टेशनची धडाकेवाज कामगिरी

दिनांक २३/०४/२०२१ “ कु – हाड , तलवारींनी खुन करुन पळुन गेलेले आरोपी ४८ तासामध्ये जेरबंद ” भारती विदयापीठ पोलीस स्टेशनची धडाकेवाज कामगिरी दिनांक २१/०४/२०२१ रोजी रात्री ० ९ / ०० वाजताचे सुमारास भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हददीत आंबेगाव पठार येथील गणराज चौकाजवळ इसम नामे संग्राम गुलाब लेकावळे , वय १ ९ वर्षे रा . आंबेगाव पठार , पुणे याचेवर डोक्यात व अंगावर कु – हाड , तलवारी , काठया अशा हत्यारांनी सपासपा वार करुन त्याचा निघुन खुन केला त्याबाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं .३ ९ १ / २०२१ भादवि कलम ३०२,१२० . ( ब ) , १० ९ , २०१,१४३ , १४७ , १४८,१४ ९ , आर्म अॅक्ट ४ ( २५ ) मु.पो.का .३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे . दाखल गुन्हयाचा तपास चालु असताना भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार प्रणव संकपाळ व शिवदत्त गायकवाड यांना सदर गुन्हयातील चार आरोपी हे बाहेरगावी पळुन जाण्याचे बेतात असुन सध्या पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहीती मिळाली त्यावरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्री जगन्नाथ कळसकर , सहा . पोलीस निरीक्षक सचिन धामणे , पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे व इतर स्टाफ यांनी पुणे रेल्वे स्टेशन परिसर पिंजुन काढुन आरोपींचा माग काढत असता आरोपी हे पोलीसांना पाहुन पळु लागल्याने त्यांना पकडुन ताब्यात घेवुन चौकशी करता ते सर्वजन बाल आरोपी असुन त्यांचेकडे सखोल तपास करता त्यांनी सदरचा गुन्हा पुर्व नियोजीत कट करुन त्याचे साथीदार नामे १ ) सचिन तानाजी वाघमारे वय २२ वर्षे रा.आबेगाव पठार कात्रज पुणे २ ) सोमनाथ दत्तात्रय गाडे वय २५ वर्षे रा.सदर ३ ) हेमंत ऊर्फ तुषार जालिंदर सरोदे वय २५ वर्षे रा.सदर यांनी सदर आरोपींना गुन्हा करण्यास प्रवृत्त करुन गुन्हयाचे कटात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले नमुद सर्व आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली कु – हाड , तिन तलवारी , काठया अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत . दाखल गुन्हयात एकुन ७ आरोपी अटक केले असुन अधिक आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास संगीता यादव , पोलीस निरीक्षक गुन्हे या करत आहेत . सदरची कामगीरी मा.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे , संजय शिंदे , अप्पर पोलीस आयुक्त , पुणे , सागर पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ २ , पुणे , सुषमा चव्हान , सहा . पोलीस आयुक्त , स्वारगेट विभाग , पुणे यांचे मार्गदर्शनाखाली जगन्नाथ कळसकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , संगीता यादव , पोलीस निरीक्षक गुन्हे , प्रकाश पासलकर , पोलीस निरीक्षक , सपोनी वैभव गायकवाड , सपोनी सचिन धामणे , पोउनि नितीन शिंदे , अंमलदार रविन्द्र भोसले , श्रिधर पाटील , संतोष भापकर , गणेश सुतार , प्रणव संकपाळ , सर्फराज देशमुख , सचिन पवार , आकाश फासगे , निलेश खोमणे , समिर बागसिराज , विजय कुंभारकर , शिवदत्त गायकवाड , जगदीश खेडकर , हर्षल शिंदे , राहुल तांबे , अभिजीत जाधव , विक्रम सावंत , संतोष खताळ , प्रसाद टापरे , रविंद्र बोरुडे , यांनी केली . 94 वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *