Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

लाच घेताना पोलीस दलातील कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी १० हजार रुपये लाच स्वीकारताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील वालचंदनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. मोहन मल्हारी ठोंबरे असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. पुणे एसीबीने ही कारवाई शुक्रवारी (दि.27) वालचंदनगर पोलीस ठाण्यात केली.

याबाबत 34 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे शुक्रवारी तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्याविरुद्ध वालचंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. दाखल तक्रारीमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार मोहन ठोंबरे यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

पुणे युनिटने पंचासमक्ष पडताळणी केली असता मोहन ठोंबरे यांनी प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी व मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने वालचंदनगर पोलीस ठाण्यात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना मोहन ठोंबरे यांना रंगेहात पकडण्यात आले.ठोंबरे यांच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल केला आहे.
पुढील तपास पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करत आहेत.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.

१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४

२. ई-मेल आयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in –

३. ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *