काळेपडळ येथे हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड, दोघांना अटक,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.( ACS )

हडपसर,,, काळेपडळ येथे हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड, दोघांना अटक,

बेकायदेशीररित्या, हुक्का पार्लर चालविला जात असल्याची खबर, हडपसर पोलिसाना मिळाल्याने त्यांनी काल दुपारी छापा टाकला असता, त्या ठिकाणाहून १५,२०० रुपये हुक्का पार्लर च्या साहित्यासह, दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे,,
(१,)जयदीप रामचंद्र पवार, वय,२८, वर्ष, रा, पवारवाडी जिल्हा परिषद शाळेमागे फुरसुंगी,( २) अमोल पांडुरंग शेलार, वय२९ वर्ष, रा,स,न,२०४ हिंद कॉलनी लेन नंबर १ ढमाळवाडी फुरसुंगी,पुणे, असे अटक केलेल्या हुक्का पार्लर चालकांची नावे आहेत, या दोघांनी, ड्रीम्स नाईट हॉटेल, काळेपडळ, येथे बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालू केले होते, या पार्लरमध्ये, विविध सुगंधी तंबाखूच्या फ्लेवर हुक्का पिण्यासाठी उपलब्ध त्यामुळे नशा येणाऱ्या तंबाखूचे झटके घेण्यासाठी विविध भागातून लोक येत,असे,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, रत्नदीप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस नाईक प्रशांत भोसले, पोलीस शिपाई रियाज शेख, निखिल पवार व प्रशांत दुधाळ, हे सर्व पेट्रोलिंग करीत असताना, संकेत विहार काळेपडळ,पुणे, येथे हुक्का फ्लेवर चा वास आल्याने, तिथे चौकशी केली , हॉटेल ड्रीम्स नाईट, येथे हुक्का पार्लर चालत असल्याची खात्रीशीर, माहिती प्राप्त झाल्याने, छापा टाकला असता, सदर हॉटेलमध्ये, एकूण १४ पुरुष हुक्का ओढत असल्याचे दिसल्याने, त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे, सदर कारवाई दरम्यान, १५,२००/ रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे,


आरोपी, (१)जयदीप रामचंद्र पवार(,२) अमोल पांडुरंग शेलार, रा,दोघेही फुरसुंगी, यांनी लोकांना धुम्रपाना साठी अवैद्यरीत्या हुक्का पुरवून त्या ठिकाणी, हुक्का पार्लर चालविताना आढळून आले, म्हणून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे,
पुढील गुन्ह्याचा तपास, सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड हे करीत आहे,


सदरची कामगिरी,मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री नामदेव चव्हाण,मा, पोलीस उप आयुक्त श्रीमती नम्रता पाटील, मा, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बजरंग देसाई, हडपसर विभाग,मा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे,पोनी,(गुन्हे) दिगंबर शिंदे,पोनी,(गुन्हे) विश्वास डगळे, यांची सूचना व मार्गदर्शना खाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस नाईक प्रशांत भोसले, पोलीस शिपाई, रियाज शेख, निखिल पवार व प्रशांत दुधाळ यांनी उल्लेखनीय कामगिरी केली,
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS)

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *