गाड्या चोरी करून घरफोडी करणारा सराईत खडकी तपास पथक, पोलीस स्टेशनच्या ताब्यात :खडकी तपास पथक ची कामगिरी.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दि. १७/०४/२०२३ (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.
गाड्या चोरी करून घरफोडी करणारा सराईत खडकी तपास पथक, पोलीस स्टेशनच्या ताब्यात :खडकी तपास पथक ची कामगिरी.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
नागरिकांच्या रहिवाशी घरात घुसून घरफोडी करणा-या व चार चाकी व दुचाकी गाडयांची गुन्हयात वापराकरीता चोरी करणा-या मालमत्तेच्या गुन्हयातील एक आरोपीस तपास पथक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीसांकडुन अटक.
दि. २३/०१/२०२२.रोजी फिर्यादी नामे संध्या संदिप बोरकर, वय ३८ वर्षे, रा. बी ६०४, एलेक्स सोसायटी, एमआयडीसी पोलीस स्टेशनसमोर, स्पाईन रोड, मोशी पुणे हया शिक्षिका असून त्यांनी त्याची काळ्या रंगाची पर्स सकाळी ०७/०० वा. ते ०७/३० वा. दरम्यान डॉ. राजेंद्र प्रसाद ४३, जी. बोपोडी, इंग्रजी माध्यम शाळा, बोपोडी, पुणे येथे मैदानाच्या गेट वर अडकवली असताना कोणीतरी अज्ञात इसमाने स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता लबाडीच्या उद्देशाने चोरी करून नेलेबाबत खडकी पोस्टे गुन्हा रजि नं. ३५/२०२३ भादवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयाचा तपास समांतर तपास तपास पथक प्रमुख पोउपनि वैभव मगदुम व त्याचा तपास पथकातील स्टाफ करत आहेत.
दाखल गुन्हयांचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री पोउपनि वैभव मगदुम व त्यांचा स्टाफ करीत असताना तपास पथक प्रमुख वैभव मगदुम यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पुणे शहर रेकॉर्डवरील आरोपी नामे- गणेश पोळके हा नुकताच काही महिन्यांपुर्वी मालमत्तेविरुध्दच्या गुन्हयातून जामिनावर बाहेर आला असून त्याचे हालचाली हया संशयास्पद असून तो पुन्हा मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करीत आहे अशी गुप्त बातमी मिळाली. पाटील ईस्टेट झोपडपट्टी पुलाखाली जवळ सायंकाळी १६:३० वा. आलो असता बातमीदारांने सांगितले वर्णनाचा एक इसम हा अंगात पर्पल रंगाचे गोल गळयाचे हाफ वाहयाचे टी-शर्ट त्यावर GAP असे लिहिलेले व ग्रे रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला इसम गल्ली नं. १० चे रोडवरील बाजूस संगमवाडी रोडकडे जाणारे दिशेने बाहेर थांबलेला दिसला असता त्याचे नाव व पत्ता- गणेश संजय पोळके, वय-२१ वर्षे, ( जन्म ता. १९ / ०९ / २००२) धंदा-बेकार, रा. गल्ली नं. १ पाटील ईस्टेट, वाकडेवाडी, पुणे असे सांगितले त्यास खडकी पो.स्टे गुरनं. ३५/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हयात दि. ११/०४/२०२३ रोजी सायंकाळी
१८:०० वा. अटक करण्यात आलेली होती. नमुद आरोपीस पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असताना दि. १३/०४/२०२३ रोजी दाखल गुन्हयातील ०२ ग्रॅम सोन्याच्या रिंगा ४,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल दाखल गुन्हयातील जप्त करण्यात आला आहे. आरोपी गणेश पोळके यांचेकडून उघडकिस आणलेले गुन्हे.
आरोपी गणेश पोळके याचेकडून पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील १) चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, गुरनं २१७ / २०२३ भादवि ३७९ २) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ५४२ / २०२३ भादवि ३७९ ३) दौंड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गु.र.नं. २१७ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९, ४) यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गु.नं. २९६ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९, ५) हिंजवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. १८७ / २०२३ भा.द.वि. कलम. ३७९ अन्वये दाखल गुन्हा उघडकिस आणलेला आहे.
आरोपी यांची गुन्हे करण्याची पध्दत :-
यातील आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते एका ठिकाणाहून दुचाकी व चारचाकी गाडया चोरी करून तिचा वापर घरफोडी चोरी करण्याकरीता करून नागरिकांच्या मालमत्तेचा वापर करून वारंवार गुन्हे करत असतात. तसेच सध्या नमुद आरोपी हा खडकी पोलीस ठाणे गुन्हा रजि. ३५/२०२३ भादंवि कलम ३७९ या गुन्ह्यामध्ये दिनांक १७/०४/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे.
सदरची कारवाई ही श्री रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री शशिकांत बोराटे, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-४ श्रीमती आरती बनसोडे, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, श्री विष्णू ताम्हाणे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन, व श्री मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) खडकी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री वैभव मगदुम, पोलीस उपनिरीक्षक, सहा.पो.फौ. श्री तानाजी कांबळे, पोलीस नाईक उध्दव कलंदर, पोलीस नाईक संदेश निकाळजे, पोलीस नाईक मुजीब शेख, पोलीस शिपाई जहाँगीर पठाण, पोलीस शिपाई सुधीर अहिवळे, पोलीस शिपाई, ऋषिकेश दिघे, पोलीस शिपाई अनिकेत भोसले, पोलीस शिपाई शिवराज खेड, पो.शि. विजय गिरासे यांनी केली असुन गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री वैभव मगदुम हे करीत आहेत.
(विष्णू ताम्हाणे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक,खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad