PMC NewsTraffice Police

येवलेवाडीतील बेकायदा बांधकामांवर कठोर कारवाई करा; बिल्डरांवर FIR दाखल करण्याची वाजिद खान यांची मागणी,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांवर केवळ नोटीस देणे किंवा काही ठिकाणी तोडक कारवाई करणे एवढ्यावरच कारवाई थांबते,

असा आरोप करण्यात आला आहे. कारवाईनंतर काही ठिकाणी पुन्हा बांधकाम सुरू होत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.“

फक्त चार खड्डे करून किंवा वरवरची कारवाई करून थांबू नये. अनधिकृत बांधकामांवर प्रत्यक्ष पाडकामाची कठोर कारवाई करावी,” अशी मागणी वाजिद खान यांनी केली आहे.तसेच अनधिकृत बांधकाम करणाऱ्या संबंधित बिल्डर व जबाबदार व्यक्तींवर FIR दाखल करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अनधिकृत बांधकामांमध्ये तयार करण्यात आलेले फ्लॅट नागरिकांना विकले जात असल्यास त्याचीही चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.“

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना गरीब नागरिकांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता मोठ्या बांधकाम व्यावसायिकांवरही समान निकषाने कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका अँटी करप्शन स्क्वॉडकडून मांडण्यात आली आहे.

महापालिका प्रशासन या तक्रारीवर नेमकी काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *