कोथरुड परिसरात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना २५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे दि.१९ :-पुण्यातील कोथरूड परिसरात शास्त्रीनगर बीट मार्शलवरील पोलीस अंमलदार, प्रदिप चव्हाण व अमोल नजन हे शास्त्रीनगर पोलीस चौकी हद्दीत रात्रगस्त घालत असताना, रात्रौ ०२/३० वा.त्यांनी तीन संशईत दुचाकी चोरांना ताब्यात घेवुन, रात्रपाळीचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक, प्रविण कुलकर्णी यांना कळविले. त्यानंतर त्यांनी पोलीस अंमलदार, बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शितकाल यांची टिमने पकडण्यात आलेल्या दोघांना कोथरुड पोलिसांनी दहशतवाद्यी हे दोन राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडुन फरार घोषित केलेल्याना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ते दहशतवाद्यी असल्याची माहिती समोर आली. अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिरादार यांनी २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी वय -२४, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान वय-२३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम वय ३१ हा पसार झाला असून त्याचा शोध पुणे पोलीस घेत आहे.या प्रकरणात अटक करण्यात आलेले इम्रान खान,युनूस साकी यांना कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पुणे न्यायालयात हजर केले.व त्यांच्या कडे बनावट आधार कार्ड आडुन आले आहे, शस्त्र बाळगणे यासह विविध कलमांन्वये दोघांविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींकडून बनावट आधार कार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळ्या, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकिट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पोलिसांना अधिक तपास करायचा असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती
सहायक सरकारी वकील ॲड. रेणुका देशपांडे यांनी युक्तीवादात केली.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिरादार यांनी दोघांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad