विविध गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी नामे मोहम्मद परवेज हुसेन सय्यद उर्फ इराणी, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२गुन्हे शाखेने केले जेरबंद.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL


विविध गुन्हयात पाहिजे असलेला आरोपी नामे मोहम्मद परवेज हुसेन सय्यद उर्फ इराणी, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२गुन्हे शाखेने केले जेरबंद.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२गुन्हे शाखे कडील सहा पो उप निरी उदय काळभोर, पो हवा दिनकर लोखंडे , पो हवा राजेश लोखंडे , पो हवा विनायक रामाने,पो हवा शाकिर खान,पो ना दत्तात्रय खरपुडे, पो ना मुकुंद पवार,पो ना गणेश लोखंडे , पो शि अमोल सरतापे असे सर्व मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो दरोडा व वाहन चोरी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर यांचे अधिपत्याखाली खडकी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात गस्त करीत शिवाजीनगर एस टी स्टँड येथे आलो असताना ,

पोलीस अंमलदार राजेश लोखंडे व अमोल सरतापे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की ,शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजि . नं .१०/२०२२ भादवि गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे मोहम्मद परवेज हुसेन सय्यद उर्फ इराणी हा मालधक्का चौक,पुणे येथे आलेला आहे, अशी खात्रीशिर बातमी मिळालेने मा वरिष्ट पोलीस निरीक्षक श्री सुनिल पंधरकर सो यांना सदर मिळालेल्या बातमीची माहिती कळवून त्यांनी बातमी प्रमाणे कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने वरील स्टाफ सह वरील ठिकाणी जावुन आडबाजुला थावंबुन माहिती घेता बातमी प्रमाणे पाहिजे आरोपी हा मिळुन आल्याने त्यास सोबत असलेल्या स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून, त्यास त्याचा नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव व पत्ता मोहम्मद परवेझ हुसेन सय्यद उर्फ इराणीअली रा परवेज इराणी , वय ३८ वर्षे रा विष्णुकृपा वस्ती,इराणी वस्ती शिवाजीनगर, पुणे असे सांगीतले असून त्यास विश्वासात घेऊन चौकशी तपास करता तो शिवाजी नगर पोलीस स्टेशन गुर नं .१०/२०२२ भादवि क १४३ ,१४४ ,१४८,१४९ , ३२४ ,३४१,भा.ह.का.क.४(२५) म.पो.का.क.३७ ( १ )(३)सह १३५ प्रमाणे दाखल गुन्हयात पाहिजे आहे असे निष्पन्न झाले आहे .

सदरील आरोपीस आहे त्या परिस्थीतीत ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करून सदर आरोपीला पुढील कार्यवाही करीता शिवाजीनगर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आलेला आहे.


पो नि सुनील पंधरकर
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२, गुन्हे शाखा,पुणे शहर.

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *