दोन वर्षापासुन फरार असणाऱ्या आरोपीस गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध
दोन वर्षापासुन फरार असणाऱ्या आरोपीस गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद
Mar 13, 2021
पुणे : लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५ ९ १ / २०१ ९ भारतीय दंड विधान संहीता कलम ३७६ , ३२८ , ३६६ , ३६३ सह बाल लैगिा अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ८ प्रमाणे दिनांक १ ९ / ०८ / २०१ ९ रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयातील आरोपी हा सुमारे २ वर्षापासुन पोलीसांना चकवा देत फिरत होता . महीलांच्या बलात्कार सारख्या गंभीर गुन्हयात फरार आरोपीच्या मागावर लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार होते . सदर गंभीर गुन्हयाची दखल घेवुन मा . सुरज बंडगर सो वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी श्री राजु महानोर , सहा.पोलीस निरीक्षक यांना सदर आरोपीचा शोध घेवुन त्यास अटक करणे बाबतच्या सुचना दिल्या होत्या . त्याअन्वये गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवुन गुन्हयातील आरोपी रूपेश बबन झोंबाडे , वय २ ९ वर्षे , रा.भिमनगर , हडपसर पुणे याचा सलग ६ तास सातारा पुणे रोडने पाठलाग करून अखेर आरोपीस तळेगाव दाभाडे , ता.मावळ , जि.पुणे येथुन ताब्यात घेवुन अटक केले आहे .
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख साो , मा.अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील सो , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील सो , मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर सो यांचे मागदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक राजु महानोर , पो .हवा नितीन गायकवाड , पोलीस नाईक विजय गाले , पोलीस कॉन्स्टेबल रोहीदास पारखे , मारूती बाराते यांचे पथकाने केली आहे .