पोलीस अंमलदार सुभाष मोरे यांचे उत्तम कार्य गहाळ झालेले १५ मोबाईल महाराष्ट्र व कर्नाटकातून केले जप्त मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी व्यक्त आला आनंद!
पोलीस अंमलदार सुभाष मोरे यांचे उत्तम कार्य
गहाळ झालेले १५ मोबाईल महाराष्ट्र व कर्नाटकातून केले जप्त
मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी व्यक्त आला आनंद!
गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध लावण्यात आले असून, १० मोबाईल महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून व ५ कर्नाटक राज्यातून जप्त करण्यात आले आहेत. ही उत्तम कामगिरी पोलीस अंमलदार सुभाष मोरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे समर्थ पोलिसांनी केली आहे. जप्त करण्यात आलेले मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत.
सतर्क पोलीस टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, गर्दीच्या ठिकाणी अथवा घाईगडबडीत मोबाईल गहाळ झाल्या प्रकरणी पुणे पोलीस दलाच्या संकेतस्थळावर १५ नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सदर मोबाईल गहाळ झाले होते. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुभाष मोरेहे तपास करू लागले. तपासादरम्यान पोलीस अंमलदार सुभाष मोरे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती मिळवली असता सदर गहाळ झालेले १० मोबाईल महाराष्ट्रात तर अन्य ५ मोबाईल कर्नाटक राज्यात वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले. हाती लागलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे समर्थ पोलीस ठाण्याच्या पथकाने मोबाईल वापरणाºयांकडे पाठपुरावा करून जप्त केले.
दरम्यान, सदर करण्यात आलेले मोबाईलची शहानिशा करून संबंधित नागरिकांना परत करण्यात आले. गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करून समर्थ पोलिसांचे आभार मानले तर वरिष्ठांनी अंमलदार सुभाष मोरे व इतर पोलीस पथकाने कौतुक केले.
सदर कारवाई परिमंडळ १ चे उपायुक्त प्रियंका नारनवरे, फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताह्माणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जोरे, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, पोलीस अंमलदार सुभाष मोरे व अन्य पोलीस पथकाने केली.