दुधाचे क्रेटस चोरणारे चोर केले २४ तासात जेरबंद Mar 16, 2021

दुधाचे क्रेटस चोरणारे चोर केले २४ तासात जेरबंद
Mar 16, 2021

पुणे : बिबवेवाडी – सदर बाबत अधिक माहिती अशी की , बिबवेवाडी पोलीस ठाणे पुणे शहर येथे दि .१३.०३.२०२१ रोजी चितळे व गोकुळ दुधाचे एकुण १८० मोकळे क्रेटस चोरी झालेबाबत गुन्हा नोंद होता . बिबवेवाडी पोलीस ठाणे तपास पथकातील पोलीस अंमलदार अमित पुजारी , दिपक लोधा व अमोल शितोळे यांनी दाखल गुन्ह्याचा छडा लावत सदर भागातील सुमारे ६० सी.सी.टी.व्ही.कॅमेरे चेक करत अरोपी नामे १ ) हरिष सिध्दु पाटील , रा.चैत्रबन वसाहत , अप्पर बिबवेवाडी पुणे २ ) मेहबुब दस्तगीर आलमेल , रा.अप्पर बिबवेवाडी पुणे यांना शिताफीने पकडुन पॅगो टेम्पो , लेन्सर कार व १८० दुधाचे मोकळे क्रेटसहीत पकडुन एकुण २,७७,००० / रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला आहे . सदरची कामगिरी ही पोलीस अंमलदार अमित पुजारी , दिपक लोधा व अमोल शितोळे यांनी परिमंडळ ०५ चे पोलीस उपायुक्त मा.नम्रता पाटील , वानवडी विभागाचे सहा.पोलीस आयुक्त श्री.राजेंद्र गलांडे , बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुनिल झावरे तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक श्री.राजेश चं.उसगांवकर यांचेसह पोलीस अंमलदार अतुल महांगडे श्रीकांत कुलकर्णी यांनी केली आहे .

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *