Breaking NewsPolice News

पुणे शहरातून विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना बंडगार्डन पोलीस ठाणे यांनी ठोकल्या बेड्या,.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक -१९ /०४/२०२२ बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर.

बसमधील तसेच बस स्टॉपवरील प्रवाशांचे मोबाईल चोरी करणा – या सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या .

पुणे शहरातून विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना बंडगार्डन पोलीस ठाणे यांनी ठोकल्या बेड्या,

बसमधील प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला बंडगार्डन पोलीस स्टेशन यांनी अटक केली आहे, त्याच्याकडून १०,०००००,/रुपये, (दहा,लाख,) किमतीचे ४६,मोबाईल जप्त करण्यात आले आहेत,

सुदाम कासिम शेख, वय २३ वर्ष, रा, कोंढवा पुणे, (२,) अनिल उर्फ अन्या बबन बोबडे, वय २७ वर्ष रा, लाल देवळा जवळ कॅम्प पुणे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावें आहेत,


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि,१६/४/२०२२ रोजी, ओंकार योगेश राठोड हे, पुणे स्टेशन वरून आपल्या कुटुंबासह ससून हॉस्पिटल पासून जात असताना, पाठीमागून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने, ओंकार राठोड, यांच्या हातातील मोबाईल हिसका देऊन, मोबाईल घेऊन फरार झाले होते, बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे दोन अनोळखी व्यक्ती विरोधात, गुन्हा नोंद, करण्यात आला होता, तक्रारदार यांनी आरोपीच्या दिलेल्या वर्णनानुसार, व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना, त्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक, राहुल पवार व, पथकाचे अंमलदार करीत असताना, त्यांना त्यांच्या गुप्त धारा मार्फत माहिती मिळाली की, मोबाईल चोरी करणारे आरोपी हे, हॉटेल सम्राट गल्ली पुणे स्टेशन या ठिकाणी थांबलेले आहे, सदर ठिकाणी जाऊन स्टाफचा मदतीने सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता,

१) सद्दाम कासिम शेख, वय २३ वर्षे कोंढवा पुणे,

(२), अनिल उर्फ अन्या बबन बोबडे, वय २७ वर्ष, कॅम्प पुणे,

अशी सांगितली, त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, त्यांनी विविध ठिकाणी व पुणे स्टेशन परिसरात, चोरी केल्याची कबुली दिली, त्यांनी स्वतःच्या लाभासाठी चोरी केल्याचे निष्पन्न झाले, तसेच पुणे शहरातील विविध ठिकाणी बस मधील प्रवाशांचे एकूण ४६ मोबाईल,,(१०,०००००) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात बंडगार्डन पोलीस स्टेशन, यांना यश आले आहे,


सदरची कारवाई, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग, श्री डहाळे, सागर पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ २, श्री यशवंत गवारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे श्री, प्रताप मानकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती, अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक,गुन्हे, बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास अधिकारी, श्री राहुल पवार, सहाय्यक पोलीस फौजदार, मोहन काळे, तसेच तपास पथकाचे पोलीस अमलदार, फिरोज शेख, हरीश मोरे, प्रताप गायकवाड, नितीन जगताप, सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, अमोल सरडे, संजय वनवे, सागर घोरपडे, किरण तळेकर, व अंकुश खानसोळे, यांनीही कामगिरी केली,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *