Breaking NewsCrime NewsPolice News

14 हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही बेडशीट घेऊन जाणारे दोन पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित;


14 हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही बेडशीट घेऊन जाणारे दोन पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित; वंचित बहुजन सामाजिक संघाच्या तक्रारीनंतर कारवाई,रस्त्यावर बेडशिट विक्री करणार्‍या विक्रेत्याकडून १४ हजार रुपयांचा हप्ता घेतल्यानंतरही २३ बेडशिट घेणाऱ्या दोघा पोलीस शिपायांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे.
पोलीस अंमलदार सुनिल भगवान कुसाळकर आणि संजय महादेव आसवले अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. दोघेही विमानतळ पोलीस ठाण्यात नेमणूकीला होते. हा प्रकार १७ सप्टेबर रोजी विमाननगर येथे घडला होता. वंचित बहुजन सामािजक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबतची माहिती अशी, अल्थमेश व त्याचे मित्र विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात सर्व जण बेडशिट विक्रीसाठी थांबले होते. १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पोलीस शिपाई सुनिल कुसाळकर व संजय आसवले तेथे आले. तुम्ही का थांबलात इथे थांबायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, असे सांगून त्यांच्याकडील ६० बेडशिट स्कार्पिओ गाडीमध्ये टाकून निघून गेले. त्यानंतर विक्रेत्यांकडून त्यांनी १४ हजार रुपये हप्ता म्हणून घेतले. त्यानंतर अल्थमेश व त्यांचे मित्रांनी बेडशिटची मागणी केल्यानंतर त्यांनी ६० बेडशिटपैकी ३७ बेडशिट परत दिले. २३ बेडशिट स्वत:कडे ठेवून घेतले होते.

याबाबत वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांना १८ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला होता. पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही पाहून सर्वांचे जाब जबाब नोंदवून घेतले. तरीही विमानतळ पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे ३० सप्टेबर रोजी अमोल निकाळजे यांनी कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता पोलीस दलाच्या शिस्तीचे उल्लंघन करुन अशोभनीय असे बेशिस्त व बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याने दोघांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी निलंबित केले आहे.


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *