Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

हडपसर मधील दोन वाहन चोरांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडून अटक.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

१७/०३/२०२३ (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान

हडपसर मधील दोन वाहन चोरांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,कडून अटक.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा , पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे वाहनचोरी, पाहिजे ,फरारी आरोपी यांचे वर कारवाईचे अनुषंगाने हडपसर पो.स्टे. हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार राहुल इंगळे व विक्रांत सासवडकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की श्री लक्ष्मी इन्कलेव्ह सोसायटी गेटजवळ जुन्या केनॉल शेजारील रोडवर माळवाडी हडपसर पुणे येथे एक पांढरे रंगाचे एक्टिवा गाडीवर दोन इसम आपसामध्ये बोलत कोणाची तरी वाट पाहत बसलेले आहेत त्यांच्याकडे असलेली गाडी चोरीची आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच सदरची बातमी पथकाचे प्रमुख सुनिल पंधरकर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविले असता त्यांनी सदर बाबत कारवाई करणे कामी योग्य त्या सूचना दिल्याने सदर ठिकाणी स्टाफच्या मदतीने सापळा रचून सदर संशयित इसमाना अत्यंत शिताफीने पकडले असता त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नाव १) शाहिद कलीम शेख, वय १९ वर्ष रा. लेन नंबर १ दिगंबर नगर गायकवाड यांच्या खोलीमध्ये वडगावशेरी पुणे २) अमन नाना कणघरे, वय. १९ वर्ष रा. आंबेडकर वसाहत सुंदरबाई मराठे शाळेजवळ चंदननगर पुणे.असे सांगितले.

त्यास ताब्यात घेऊन अधिक चौकशीत त्याचे ताब्यात एक्टिवा कंपनीची गाडीचे मालकी व कागदपत्र बाबत चौकशी केली करता त्यांनी काहीही उपयुक्त व समाधान-कारक माहिती न दिल्याने तसेच उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्या कडे असलेली .एक्टिवा गाडी बाबत हडपसर पो स्टे येथे गु र नं 189/2023 भादवि 379 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले.त्याना पथकाचे कार्यालयात आणुन अधिक चौकशी केली असता एकूण ५ दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन सदर मोटार सायकली पंचनाम्याने जप्त केल्या आहेत.

आरोपीकडून खालील प्रमाणे एकूण 5 गुन्हे उघडकीस आणलेले आहे
1) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 189/2023, कलम 379
2)पिंपरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 291/2023, कलम 379
3) वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 133/2023, कलम 379
4) येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 125/2023, कलम 379
5)स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 238/2022, कलम 379

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकामी हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे सो, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. नारायण शिरगावकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी पोलीस, उपनिरीक्षक गुंगा जगताप पोलीस अंमलदार राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, दत्तात्रय खरपुडे, सुदेश सपकाळ, विनायक येवले, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर, अमोल सरतापे यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *