Crime News

खुनाच्या प्रयत्न व दरोडयाच्या गुन्हयातील सराईत गुन्हेगारास युनिट ६ ने केले जेरबंद


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – १६/०७/२०२१ युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहर खुनाच्या प्रयत्न व दरोडयाच्या गुन्हयातील सराईत गुन्हेगारास युनिट ६ ने केले जेरबंद

दिनांक १४/०७/२०२१ रोजी पो . शि . ऋशिकेश व्यवहारे व पो . शि . ताकवणे यांना युनिट ६ चे हद्दीत गस्त करत असताना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ,

लोणीकंद पोलीस स्टेशन गु . र , क्र . २५९ / २०२१ भादवि कलम ३०७ , १४३ , १४७ , १४८ , १४९ , ५०४ , ५०६ , सह आर्म अॅक्ट कलम ४ ( २५ ) व लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु . र . क्र . २६२/२०२१ भादवि कलम ३९९ . ४०२ सह आर्म अॅक्ट कलम ४ ( २५ ) या दोन गुन्हयायतील पाहिजे आरोपी

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

आकाश गणपत माने , वय २४ वर्षे , रा . लाडोबा वस्ती , केसनंद , वाघोली , पुणे हा त्याच्या नातेवाईकाच्या घरी लाडोबा वस्ती , केसनंद , वाघोली , पुणे येथे येणार आहे . सदर बाबत श्री गणेश माने , पोलीस निरीक्षक , गुन्हे शाखा , युनिट -६ , पुणे शहर यांना कळविले असता त्यांनी सदर माहितीची खातरजमा करून माहितीप्रमाणे नमुद ठिकाणी कारवाई करून आरोपी ताब्यात घेवुन कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लाडोबा वस्ती , केसनंद , वाघोली , पुणे याठिकाणी जावून खात्री केली असता नमूद आरोपी हा त्याच्या नातेवाईकाच्या घरी आला होता , परंतू त्यास पोलीसांची चाहूल लागल्याने तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले .

त्याची वैदयकिय तपासणी करून लोणी काळभोर पो . स्टे . कडील वर नमूद गुन्हा हा दरोडा व वाहन विरोधी पथक २. गुन्हे शाखा , पुणे शहर यांच्याकडे तपासकामी असल्याने नमूद आरोपीस त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे . नमूद आरोपीचा गुन्हेगारी अभिलेख पाहता त्याच्यावर दरोडा , जबरी चोरी , घरफोडी इ . गुन्हे दाखल आहेत .

सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त , डॉ . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , श्री . अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे २. श्री . लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट , ६ चे पोलीस निरीक्षक , श्री . गणेश माने , सपोनि नरेंद्र पाटील , अंमलदार मच्छिंद्र वाळके , कानिफनाथ कारखेले , नितीन शिंदे , नितीन मुंढे , प्रतिक लाहिगुडे , ऋषिकेश व्यवहारे , ऋषिकेश ताकवणे , सचिन पवार , ऋषिकेश टिळेकर , नितीन धाडगे , शेखर काटे व सुहास तांबेकर यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *