लष्कर पोलीसांन कडुन वाहन चोर जेरबंद

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

दिनांक – १५/०७/२०२१ लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर लष्कर पोलीसांन कडुन वाहन चोर जेरबंद

दि .१२ / ०७ / २०२१ रोजी सपोनि राऊत , पोलीस उप निरिक्षक डोंगळे तसेच तपास पथकातील पोहवा ५६७९ कदम , पाशि १२००५ शिरगीरे , पोना २७२१ गायकवाड , पोना ७५७१ नदाफ , पोशि ९८१५ भोसले , पोशि ८८०५ पठाण , पो.शि .७८७७ मांजरे , पोशि ७८९१ कोळी असे लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं .८५ / २०२१ भादवि ३७९ मधिल चोरीस गेले गाडीचा व आरोपीचा शोध घेत असताना पोहवा ५६७९ कदम , पाशि १२००५ शिरगीरे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली

की , एक इसम चोरीची गाडी घेऊन जेजे गार्डन जवळ , कॅम्प पुणे येथे थांबला आहे . त्याचेकडे काळया लाल रंगाची होंडा कंपनीची सी बी शाईन गाडी नंबर एम एच -१४ एफ क्यु -६९४७ गाडी आहे . सदर बातमीचा आशय मा . वरिष्ठांना कळवुन वर नमुद स्टाफसह लागलीच जेजे गार्डन कॅम्प , पुणे येथे गेलो असता एक इसम वर नमुद गाडीसह सदर ठिकाणी थांबला होता व त्याचे ताब्यात चोरीस गेलेली वरिल वर्णनाची गाडी होती तो आम्हाला पाहताच गाडी सोडुन पळुन जाऊ लागला असता वर नमुद स्टाफच्या मदतीने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव कुणाल राजेश चावरिया , वय २२ वर्षे , काम मजुरी रा . प्रथमा बिल्डींग , फ्लॅट नं . १०१ , रामटेकडी , हडपसर , पुणे असे असल्याचे सांगितले . त्यास सदर गाडी याचे ताब्यात असलेबाबत विचारले असता त्याने सदर गाडी कॅम्प एज्युकेशन कन्याशाळा , सोलापुर बाजार , कॅम्प , पुणे येथुन दि .१० / ०७ / २०२१ रोजी दुपारी चोरलेबाबत सांगितल्याने सदर गाडीचा व चोरीस गेलेले गाडीचा आरटीओ नंबर चेक केला असता सदर गाडी चोरीस गेलेबाबत लष्कर पोलीस ठाणे येथील अभिलेख चेक करुन खात्री केली असता लष्कर पोलीस ठाणे गुरन ८५/२०२१ भा.द.वि. कलम ३७९ या गुन्हयातील चोरीस गेलेली गाडीच असल्याची खात्री झाल्याने लागलीच सदर ठिकाणावरुन जाणारे येणारे दोन इसमांना पंचाना बोलावुन घेऊन सदर गाडी त्याचे ताब्यातुन पंचासमक्ष जप्त करुन आरोपी कुणाल राजेश चावरिया , वय २२ वर्षे , काम- मजुरी रा . प्रथमा बिल्डींग , फ्लॅट नं . १०१ , रामटेकडी , हडपसर , पुणे यास लष्कर पोलीस स्टेशन येथे आणुन त्यास लष्कर पोलीस ठाणे गुरन ८५/२०२१ भा.द.वि. कलम ३७९ या गुन्हया मध्ये दिनांक १२/०७/२०२१ रोजी २१.३५ वा अटक करण्यात आली आहे .

तसेच अटक आरोपी कडुन हडपसर पोलीस स्टेशन , पुणे गुन्हा रजि नं . ४८२/२०२१ भादवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली मोटार सायकल क्रमांक एम.एच .१३ बी.टी. ५१७७ व लष्कर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं . ११७/२०१८ भादवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली मोटार सायकल क्र . एम.एच .१२ सी.पी. ४०७७ या गाडया जप्त करण्यात आल्या आहेत .

सदर गुन्ह्याचा तपास श्री.सागर पाटील साो , पोलीस उप आयक्त , परि २ , पुणे शहर , श्री.चंद्रकांत सांगळे साो , सहा . पोलीस आयुक्त लष्कर विभाग , श्री.अशोक कदम वरिष्ठ पोलीस निरिक्षक व श्री.कविदास जांभळे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) लष्कर पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली , सहा पोलीस निरिक्षक , श्री राऊत पोलीस उप निरिक्षक डोंगळे व तपास पथकातील वरील अंमलदार लष्कर पो स्टे पुणे यांनी सदर कामगिरी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *