कोंढवा खुर्दमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा इशारा; बिल्डरांवर गुन्हे दाखल होणार?apsc.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे | प्रतिनिधी : कोंढवा खुर्द परिसरातील अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगरपालिकेकडून कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या इमारतींची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, ज्या बिल्डरांनी कथितरित्या अनधिकृत बांधकामे उभारली आहेत आणि ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्या स्वतःच्या घरांवर किंवा मालमत्तांवरही महापालिका कारवाई करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

कोंढवा खुर्दमधील कोणत्या बांधकामांवर कारवाई होणार आणि संबंधित बिल्डरांची नावे कोणती, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अधिकृत तपासणी व प्रशासनाच्या निर्णयानंतरच संबंधितांची नावे स्पष्ट होतील.

