पेट्रोलिंग करीत असताना दुचाकी चोरास हत्यारासह समर्थ पोलीसांनी केली अटक .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार.श्री संदीप जोरे पोलीस अंमलदार हेमंत पेरणे ची कामगिरी .

दुचाकी चोरास हत्यारासह समर्थ पोलीसांनी केली अटक .

समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप जोरे , व तपास पथकातील पोलिस अमंलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , अंगात काळया रंगाचा टी शर्ट व काळया रंगाची काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला एक इसम हा बारणे रोड येथील भंगारचे दुकानाजवळ मंगळवार पेठ पुणे येथे दुचाकी स्प्लेंडर गाडीवर बसलेला असुन त्याचे जवळ कोयत्या सारखे हत्यार आहे .

सदरची खबर सहाय्यक पोलीस निरीक्षक जोरे यांनी समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन योग्य ती कारवाई करणेस सांगितल्याने तपास पथकातील स्टाफ खाजगी गाडीवर बातमीचे ठिकाणी जावुन खात्री केली असता , बातमीतील इसम सदर ठिकाणी दुचाकी स्प्लेंडर गाडीवर मिळुन आला . त्यास त्याचा नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याने पहिले उडवाउडवीची उत्तरे दिली . सदर इसमास विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता , त्याने आपले

नाव सचीन रामदास चिकटे , वय ३० वर्षे , रा . पुणे फिरस्ता . मुळ रा.मु.पोस्ट . तांदुळवाडी , तोलुका आकोट जिल्हा अकोला असे असल्याचे सांगितले .

त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या डाव्या कमरेस एक लोखंडी कोयता मिळुन आला . तसेच त्याच्या ताब्यातील एक काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटर सायकल तिचे आर.टी.ओ. नंबर प्लेट वर एम.एच.१६ ए.एल. ४८८१ असा नंबर असलेली तिचा चॅसिस नंबर MBLHA10EEAHC04611 इंजिन नंबर- HA10EAAHCA3953 असा असलेली दुचाकी मिळून आली . तो इसम , दुचाकी व कोयता स्टाफच्या मदतीने समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आणले . सदर इसमाला विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता , सदरची दुचाकी ही कोरेगाव पार्क पुणे या ठिकाणाहून चोरल्याचे त्याने सांगितले . कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचा अभिलेख पडताळला असता त्या ठिकाणी सदर वाहनाबाबत गुन्हा रजिस्टर क्र . ५७/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल असल्या समजले . सदर इसमावर समर्थ पोलीस स्टेशन गु.र.नं. १०२/२०२२ आर्म अॅक्ट कलम ४ ( २५ ) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पुढील कारवाई चालू आहे .

सदरची कामगिरी ही मा . राजेंद्र डहाळे अप्पर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशीक विभाग , पुणे शहर , मा . श्रीमती डॉ . प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – १ पुणे शहर , मा . श्री . सतिश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरासखाना विभाग , पुणे श्री . विष्णु ताम्हाणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , समर्थ पो.स्टे . उल्हास कदम , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जोरे , पोलीस हवालदार संतोष काळे , पोलीस नाईक सुभाष पिंगळे , पोलीस अंमलदार हेमंत पेरणे , श्याम सुर्यवंशी , सुभाष मोरे , विठ्ठल चोरमले यांनी केली आहे .

विष्णू ताम्हाणे वरिष्ठ पोलीस निरिक्षक समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *