पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ताचा MPDA कायद्यान्वये ७० वी कारवाई.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
पुणे शहर पोलीस आयुक्तांचा अट्टल गुन्हेगारांना दणका,MPDA कायद्यान्वये ७० वी कारवाई.
पुणे,दि.२८:- पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तब्बल ७० जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगार युसुफ उर्फ आतुल फिरोज खान (वय – २४ रा. लोहीयानगर, पुणे)
असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. युसुफ उर्फ आतुल खान याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले आहे.
युसुफ उर्फ आतुल खान हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता, तलवार, लाकडी दांडके यासारख्या हत्यारांसह फिरत असताना गंभीर दुखापत करणे,जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.
मागील पाच वर्षात त्याच्यावर ०५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी युसुफ उर्फ आतुल खान याच्यावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट,पी. सी. बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे
यांनी ही कामगिरी केली.
पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात ७० जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्का, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad