Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

दारुला पैसे न दिल्याने पत्नीचा साडीने आवळला गळा;खुनाचा प्रयत्न केल्याचा वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. .apcs.news


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पैसे न दिल्याने पत्नीला गळफास दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला गळफास लावून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

दिनांक २१/०९/२०२३ रोजी रात्री २२/०० ते २२/३० वा.चे दरम्यान अमर भारत सोसायटी जवळ पवार यांचे खोलीत दुस-या माळयावर वारजे माळवाडी,पुणे

(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान

दारुला पैसे न दिल्याने पत्नीचा साडीने आवळला गळा; पतीने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल.येथे यातील फिर्यादी हे राहत असलेल्या पवार यांचे खोलीतील दुस-या माळयावर फिर्यादी यांची मुलगी सौ. शिला संतोष शिरसाठ, वय – ३० वर्षे हीस फिर्यादी यांचे जावई यातील नमुद इसमाने सौ. शिला हिस दारु पिण्याकरीता पैशाची मागणी करुन, तीने पैसे दिले नसल्याचा राग मनात धरुन, तीचेशी भांडण व शिवीगाळ करुन, सौ. शिला हिस लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून, साडीने तीचा गळा आवळुन, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

दारु पिण्यास पैसे न दिल्याने पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन साडीने तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शिला संतोष शिरसाठ (वय ३०, रा. वारजे माळवाडी) असे महिलेचे नाव असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याप्रकरणी तिचे वडिल माधव नारायण सूर्यवंशी (वय ६०, रा. केदार बुडा, पो. कवाना, ता. हदगाव, जि. नांदेड) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु.रजि. नं. ४०५/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संतोष शिरसाठ (वय ४०, रा. वारजे माळवाडी) याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वारजे माळवाडी येथील त्यांच्या घरी २१ सप्टेबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडला.याबाबत पोलिसांनी सांगितले की, संतोष शिरसाठ हा मजुरी काम करतो. ते मुळचे नांदेडचे राहणारे आहेत.सुमारे दीड दोन महिन्यांपूर्वी ते पुण्यात रहायला आले. संतोष याने दारु पिण्यासाठी शिला हिच्याकडे पैसे मागितले.त्याला पैसे देण्यास शिला हिने नकार दिला. तेव्हा त्यांच्यात भांडणे झाली. संतोष याने शिला हिला शिवीगाळ करुन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. साडीने तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आवाज ऐकून आजू बाजूचे तेथे आल्यावर त्यांनी शिला हिची सुटका केली. शिला हिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिचे वडिल गावाकडून पुण्यात येऊन त्यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर संतोष शिरसाठ पळून गेला असून पोलीस उपनिरीक्षक ओलेकर तपास करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *