खडक पोलीस स्टेशनचे हद्दीत, अवैध धंदे लपून छापून सुरूच? पुण्यातील मटका किंग नंदू नाईकच्या अड्यावर पोलिसांचा छापा;apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
खडक पोलीस स्टेशनचे हद्दीत, अवैध धंदे लपून छापून सुरूच? पुण्यातील मटका किंग नंदू नाईकच्या अड्यावर पोलिसांचा छापा;apcs.in
पुण्यातील मटका किंग नंदू नाईक याच्या शिवाजी रोडवरील जनसेवा बिल्डिंगमधील अड्यावर छापा टाकून ८ जणांना अटक केली आहे.त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साधनांसह २ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांनी अनेकदा छापे घातल्यानंतरही काही दिवसांनी नंदू नाईकचे हे,याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस हवालदार त्रिंबक बामगुडे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संतोष लक्ष्मण गुजर (वय ५२, र. शिवाजीनगर गावठाण), रवींद्र धोंडिबा गजदाणे (वय ४२, रा. पिरंगुट), गोविंद अनंतराव वेदपाठक (वय ४३, रा. सासवड), राजू बबनराव गोरे (वय ३२, रा. पिरंगुट), किसन दत्तात्रय तावरे (वय ४३, रा. पिरंगुट), रोहन किसन तावरे (वय १९, रा. धाराशिव), निलेश कृष्णाजी रणपिसे (वय ५२,रा. सांगवी), नंदकुमार बाबुराव नाईक (वय ७६, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकुमार नाईक हा मटका किंग म्हणून ओळखला जातो. त्याचे शहरात अनेक ठिकाणी मटक्याचे अड्डे सुरु असतात. शुक्रवार पेठेतील जनसेवा भोजनालयाचे मागील जागेत मटका अड्डा सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट १ व युनिट २ च्या अधिकार्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने येथे छापा घातला. तेव्हा तेथे कल्याण ओपन मटका जुगाराच्या चिठ्ठया दिल्या जात होत्या. त्यांच्याकडून मोबाईल, ९५ हजार ७४० रुपये रोख, जुगाराची साधने असा २ लाख ११ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम तपास करीत आहेत.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in