कोंढवा पोलीस ठाणे कडील खुनाचे गुन्ह्यातील आरोपींना 24 तासाच्या आत जेलबंद केले
कोंढवा पोलीस ठाणे कडील खुनाचे गुन्ह्यातील आरोपींना 24 तासाच्या आत जेलबंद केले
Sep 29, 2020
तपास पथकातील पोलिस कर्मचारी श्री. अझीम शेख यांची उत्तम कामगिरी
पुणे :- पिसोळी येथील श्री बालाजी गॅरेज चे मालक असुन त्यानी फिर्याद दिली की. दि.26/09/2020 रोजी दुपारी 03:30 वा. चे सुमारास त्यांचे ओळखीचा सागर दादा आवताडे रा.अवताडे वाडी ता.हवेली जि.पुणे याची दुचाकी गाडी दुरुस्त करत असताना सागर अवताडे हा गॅरेज च्या बाहेर बसला होता . त्या वेळी एक कार गॅरेज समोर थांबली त्यातून तीन अनोळखी इसम हातात लांब धारदार हत्यारे घेउन खाली उतरुन सागर अवताडे याच्या जवळ आली व तिघांनी सागर अवताडे याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यामागे ,व अंगावर इतरत्र त्यांच्या कडील हत्यारांनी सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करून जीवे ठार मारले वगैरे तक्रार दिल्याने अनोळखी तीन आरोपींवर कोंढवा पोलीस ठाणेस गुन्हा रजि नं. 1058/2020 भा.द.वि.कलम 302 , 307 ,34 सह भरतीय हत्यार कायदा कलम 4(25). महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 135प्रमाणे वरिल प्रमाणे गुन्हा दाखल केला.
दखल गुन्ह्याचा तपास चालू असताना बातमीदार यांच्या मार्फतीने पो.शि.8475 आझीम शेख यांना माहिती मिळाली की यातील आरोपी नामे नारायण ऊर्फ माया विश्वनाथ पुरी ,वय 25वर्ष रा.स.नं.312 गल्ली नं.3, पेट्रोल पंपाजवळ ,सार्थक लॉज समोर,सुंदर सोसायटी, हांडेवाडी ,पुणे मुळ गाव – ब्राम्हणगाव , मारुती मंदीरा शेजारी , ता.जिंतुर जि.परभणी.व 2) जूनेद नसीर शेख , वय 20वर्षे , जन्मतारीख 07/10/1999 , धंदा डिलीव्हरी बॉय , रा.सय्यदनगर ,गल्ली नं.19, अश्रफ मस्जीद समोर, हडपसर,पुणे मुळ गाव – बुद्धनगर , इकबाल शाळे जवळ ता.व जि.लातूर याची नावे तपासात निष्पन्न झालेने व यातील उपरोक्त आरोपी हे महम्मदवाडी, कृष्णानगर पुणे येथे लपुन बसले असेल बाबद पो.ना.पांडुळे पो.शि.8475 आझीम शेख व पो.शि.8440 दिपक क्षीरसागर याना माहिती मिळाल्याने सदर बाबद लागलीच आम्हास कळविलेने त्या प्रमाणे आम्ही वरिष्टांची परवानगी घेऊन आरोपीचे बाबद मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक शिंदे ,सपोफौ इक्बाल शेख ,सपोफौ सुरेश भापकर पो.ना 6452 पृथ्वीराज पांडुळे पो.ना.685 जाधव पो.ना.1138 धिवार पो.शि.7770 मोरे पो.शि.8440दिपक क्षीरसागर पो.शि.8475आझिम शेख पो.शि.8933 मोहन मिसाळ असे स्टाफ सह बातमीचे ठिकाण रवाना हाऊन बातमी प्रमाणे वरील स्टाफची खात्री होताच मिळालेल्या महीती नुसार खात्री होताच वरील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे विचारपुस केली परंतु तेथे त्यानी कोणतीच महीती न दिल्याने त्यास पुढिल चौकशी कामी पोलीस ठाणेस घेऊन आल्यावर त्यांच्या कडे त्याना विश्वासात घेऊन चौकशी करता त्याने वरील गुन्हा जुने वैम्यनस्थातुन केलेला असलेचे सांगितले आहे .
सदरची कामगिरी मा.श्री.नामदेव चव्हाण सो.अप्पर पोलीस आयुक्त ,पुर्व प्रदेशिक विभाग , पुणे शहर, मा.श्री.सुहास बावचे सो.पोलीस उप आयुक्त परिमंडळ पुणे शहर , श्री.विनायक गायकवाड वरिष्ट पोलीस निरीक्षक श्री.महादेव कुंभार पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक संतोष शिंदे सपोफौ इक्बाल शेख , सपोफौ सुरेश भापकर , पो.हवा.3688 योगेश कुंभार पो.ना.6452 पृथ्वीराज पांडुळे पो.ना.385 कौस्तुभ जाधव पो.ना.1138 धिवार पो.शि.8440 दिपक क्षीरसागर , पो.शि.8475 आझीम शेख पो.शि. 7770 मोरे व पो.शि. मोहन मिसाळ यांनी केलेली आहे.