पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन ‘राडा’ ! 40 ते 50 वाहनांची तोडफोड

पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात टोळक्याकडून दहशत माजविण्यासाठी हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन ‘राडा’ ! 40 ते 50 वाहनांची तोडफोड
Jan 29, 2021

पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात दहशत माजवण्यासाठी टोळक्याने चांगलाच राडा घातला असून मध्यरात्री या टोळक्याने आंबेडकरनगर येथील तब्बल 40 ते 50 वाहनांची तोडफोड केली. पोलीस 7 जणांचे नावे सांगत असले तरी स्थानिकांनी मात्र 15 ते 20 जणांचे टोळके आले होते, असे सांगितले आहे. यामुळे व्यापारी वर्ग आणि वसाहतीत चांगलीच दहशत पसरली आहे.

याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 4 जणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरात आंबेडकरनगर वसाहत आहे. या भागात कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. कष्टकऱ्यांची प्रवासी रिक्षा, टेम्पो रिक्षा, दुचाकी, हातगाडी यासारखी अनेक वाहने रस्त्यावर पार्क केलेली असतात. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री दहा वाजण्याच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हातामध्ये तलवारी, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन या परिसरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. मोठमोठ्या आरडाओरडा करत हे टोळके सुटले आणि त्यांनी समोर दिसेल त्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी एकजण मध्ये आला असता त्याला देखील मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तोडफोड तर केलीच पण वाहनांच्या सीट देखील फाडल्या. तब्बल तासभर या टोळक्याचा धुडगूस सुरू होता. दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मार्केटयार्ड पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोडफोड झालेल्या वाहनांची पाहणी केली. त्यानंतर टोळक्याच्या विरोधात मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व प्रकारानंतर स्थानिक नागरिक मात्र चांगलेच संतप्त झाले.

पोलिसांचा वचक राहिला नसल्यामुळे गुन्हेगार अशा प्रकारचे कृत्य करण्यास धजावत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त घालावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी यावेळी केली आहे

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *