वाहनचोरी करणारा अट्टल गुन्हेगार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडून जेरबंद.

वाहनचोरी करणारा अट्टल गुन्हेगार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ कडून जेरबंद

    पुणे शहरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर आळा बसावा याकरिता मोहीम राबवून कारवाई करणे बाबत वरिष्ठ अधिकारी यांनी आदेशित केले होते. त्या प्रमाणे काल दिनांक ०१/०५/२०२२रोजी दरोडा  व वाहन चोरी विरोधी पथक २चे पोलीस उप निरीक्षक गुंगा जगताप व पोलीस अंमलदार वानवडी,हडपसर पोलीस स्टेशन चे हद्दीत गस्त घालत असताना *पोलीस नाईक शिवाजी जाधव* यांना त्यांचे बातमीदारा कडून माहिती मिळाली कि वैदवाडी चे जवळील रेल्वेचे नवीन पुला लगत एक पगडी बांधलेला इसम काळे ॲक्टिव्हा गाडीवर संशयीत थांबलेला आहे अशी माहिती मिळाल्याने सदर इसमास सापळा रचून पकडले असता त्याने त्याचे नाव बच्चनसिंग जोगेंदरसिंग भोंड वय २३ रा.बिराजदार नगर हडपसर पुणे असे सांगितले. त्यास  सदरील ॲक्टिव्हा गाडीसाह ताब्यात घेऊन  त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने पुणे ,सोलापूर असे विविध ठिकाणाहून वाहने चोरी केल्याचे सांगितले,  त्याने चोरी केलेल्या  एकूण ०८मो/ सायकल व ०२ चारचाकी गाड्या जप्त करून त्यांच्याकडून खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

१) लोणीकंद पो स्टे गु र क्र
२००/२०२२ भा द वी कलम
३७९
२)हडपसर पो स्टे गु र क्र
४५६/२०२२ भा द वी कलम
३७९
३)हडपसर पो स्टे गु र क्र
१०९२/२०१९ भा द वी कलम
३७९
४) मोहोळ पो स्टे सोलापूर ग्रामीण गु र क्र
१०५६/२०२१ भा द वी कलम
३७९
५) हडपसर पो स्टे गु र क्र
४९५/२०२२ भा द वी कलम
३७९
६) हडपसर पो स्टे गु र क्र
४८७/२०२२ भा द वी कलम
३७९
७)शिवाजीनगर पो स्टे गु र क्र
३४/२०२२ भा द वी कलम
३७९
८) वानवडी पो स्टे गु र क्र
१२०/२०२२ भा द वी कलम
३७९ व इतर 2 वाहनांबाबत तपास चालू आहे
अशा प्रकारे नमूद आरोपींकडून *एकूण ०८ वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले असून गुन्ह्यात *एकूण २,९५,०००/- रुपये किमतीच्या १० मोटर सायकल* जप्त करण्यात आल्या आहेत.

    *सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री  रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री श्रीनिवास घाडगे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा,श्री नारायण शिरगावकर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार उदय काळभोर,राजेश लोखंडे,विनायक रामाने,शाकिर खान,शिवाजी जाधव ,गणेश लोखंडे ,सुदेश सपकाळ* यांनीकेलेली आहे.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *