वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन,

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्यावतीने सुपा ख्वाजा शहा मन्सूर दर्गाह येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी वडगाव निंबाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे,साहेब, पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,


रमजान महिन्याला मुस्लीम धर्मात विशेष महत्त्व असून या महिन्याला पाक महीना देखील म्हटले जाते संपूर्ण रमजान महिन्यात मुस्लिम धर्मातील लोक अल्लाहची इबादत करतात आणि महिनाभर रोजा ठेवतात मुस्लिम बांधवांच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, समाजात सलोखा राहावा हिंदू मुस्लीम ऐक्य राहावे यासाठी अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असल्याचे पाहावयास मिळाले

यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन सोमनाथ लांडे(,API) यांचा सत्कार मन्सूर युथ क्लब दर्गा कमिटीतर्फे करण्यात आला, यावेळी, सुपा ग्रामपंचायत सदस्य, मुनीर डफेदार, दर्गा कमिटीचे कार्यकर्ते, गालिब अली हसन शेख, आयुब युनूस शेख, अतुल खैरे सामाजिक कार्यकर्ते, तसेच सर्व पोलिस कर्मचारी व सुपा येथील पत्रकार बांधव, जयराम सुपेकर, सुदामराव नेवसे, दीपक जाधव, सचिन पवार, फिरोज मोगल व मुस्लीम बांधव, उपस्थित होते,

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे साहेबांनी, सर्वांना ईदसाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती, शहा मन्सूर दर्गा कमिटीचे मुख्य विश्वस्त, इनुस कोतवाल, यांनी माहिती दिली,


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *