नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत आलेल्या छत्तीसगडच्या मुलीवर अत्याचार

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत आलेल्या छत्तीसगडच्या मुलीवर अत्याचार
नराधम रिक्षा चालकाच्या पनवेल पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी छत्तीसगडहून मुंबईत आलेल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपी रिक्षा चालकाने मुलीच्या डोक्यात दगड टाकून जिवे मारण्याची धमकी देऊन कूकर्म केले होते. या गंभीर गुन्ह्याची अवघ्या १२ तासात पोलिसांनी उकल केली. उत्तमरीत्या सदर गुन्ह्याचा तात्काळ तपास केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलीस दलाचे आयुक्त बिपिनकुमार सिंह आणि उपायुक्त शिवराज पाटील यांनी तपासी पोलीस पथकाचे कौतुक केले.   
   सतर्क पोलीस टाईम्सला मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील जसपूर जिल्ह्याची रहिवासी असलेली मुलगी ख्रिसमस आणि नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईला जाण्यास निघाली. सर्वप्रथम झारखंडवरून ती दिल्लीत आली. त्यानंतर तेथे एक दिवस हॉटेलमध्ये मुकाम केला व दुसऱ्या दिवशी पश्चिम एक्सप्रेसमध्ये मुंबईला जाण्यासाठी बसली. दरम्यान, २२ डिसेंबर २०२० रोजी मुलगी वांद्रा रेल्वे टर्मिनस येथे आली. एकटीला पाहून तिकीट तपासणी करणाºया अधिकाºयाने (टीसीने) मुलीला चाईल्ड हेल्प लाईनच्या ताब्यात दिले. त्या मुलीची चौकशी करून तिला सखी सेंटरमध्ये पाठवण्यात आले. तेथे संपूर्ण चौकशी केल्यानंतर मुलगी १९ वर्षांची असल्याचे निष्पन्न झाल्याने तिला सोडून देण्यात आले.
दरम्यान, २६ डिसेंबर रोजी मुलगी सकाळी पनवेल रेल्वे स्थानकात आली. त्या ठिकाणी तिची शिवा नावाच्या इसमासोबत ओळख झाली. मुलगी त्या इसमासोबत राहिली. २७ डिसेंबर रोजी मुलगी पनवेल रेल्वे स्थानक येथून एका रिक्षाला हात दाखवून गांधी गार्डनला जाण्यास बसली. मात्र रिक्षा चालकाने मुलीला गांधी गार्डनला नेण्याऐवजी वडघर नदीच्या काठाजवळील स्मशानभूमीजवळ आणले. तेथील निर्जनस्थळी असलेल्या झाडीत मुलीला नेऊ न त्या रिक्षा चालकाने तिला डोक्यात दगड घालण्याची धमकी देऊन अत्याचार केला. सदर कूकर्म करून रिक्षा चालक पीडित मुलीला तेथेच सोडून पळून गेला.
या घटनेतून स्वत:ला सावरून पीडित मुलीने पनवले पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी (गु. र. क्र. ४९९/२०२०) भादंवि कलम ३७६, ५०६(२) नुसार गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊ न पनवेल ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताबडतोब तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांनी रेल्व स्थानक परिसरासह अनेक रिक्षा चालकांची चौकशी केली. तपासादरम्यान पोलिसांना रिक्षा चालकाची माहिती समजली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी सचिन लालताप्रसाद शर्मा (२६) याच्या पनवेलमधील बारवाई गावात मुसक्या आवळल्या. या कारवाईदरम्यान पोलिसांनी रिक्षादेखील जप्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी करत आहेत.  
 सदर गुन्ह्याची उकल नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील आणि पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे, पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, हवालदार विजय आयरे, हवालदार वाघमारे, पोलीस अंमलदार राजू खेडकर, पोलीस नाईक विनोद पाटील, पोलीस अंमलदार सुनील गर्दनमारे, पोलीस अंमलदार यादवराव घुले, पोलीस नाईक पंकज पवार, पोलस नाईक परेश म्हात्रे, पोलीस नाईक गणेश चौधरी, पोलीस अंमलदार साळुंखे आदी पथकाने केली.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *