रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक-०१ वर चालत असताना एक व्यक्ती अचानक चक्कर येऊन रेल्वे ट्रॅकवर पडली.
तारीख – २६/१२/२०२०
२६/१२/२०२० रोजी ग्रँट रोड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक-०१ वर चालत असताना एक व्यक्ती अचानक चक्कर येऊन रेल्वे ट्रॅकवर पडली. याच दरम्यान ट्रॅकवर लोकल ट्रेन ९०३२३ येत असल्याचे पाहून व सदर व्यक्तीच्या जीवाला धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सुरक्षा बलाची महिला जवान लता बंसोले यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता ट्रॅकवर उडी मारली आणि लोकल मोटरमनला गाडी थांबविण्याचा इशारा केला. सदर जखमी व्यक्तीस महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या महिला जवान लता बंसोले आणि रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय कैलासचंद मोके या दोघांनी प्रवाशांच्या मदतीने फलाटावर आणले व त्या जखमी व्यक्तीस घेऊन रेल्वे स्टेशनबाहेरील दवाखान्यात घेऊन गेले.
प्रथमोपचारानंतर, परिस्थिती सामान्य झाल्यावर त्या व्यक्तीची चौकशी केल्यानंतर त्याने त्याचे नाव – श्री इराणी कैझाड, वय – ४६ वर्षे, रा.ठि- इमारत क्र.२२,पारसी कॉलनी भाटिया रुग्णालयाजवळ,मुंबई असे सांगितल्यानंतर त्या व्यक्तीला पुढील अधिक उपचारांसाठी रुग्णालयात नेल्यानंतर त्याने स्वेच्छेने स्वत: ला बरे असल्याचे सांगितले आणि नंतर टॅक्सीमध्ये बसून घरी पाठवले.
या घटनेमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या महिला सुरक्षा जवान लता बंसोले आणि रेल्वे सुरक्षा बलाचे एएसआय कैलासचंद मोके यांनी आपल्या कर्तव्यात दक्षता आणि कर्तव्य दर्शविणारे कार्य केले,याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.