पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखे ३ कडून घरफोडी करणा-या टोळीस अटक करून एकुण १,२२,४४,०००/किं.चा मुददेमाल केला हस्तगत,apcs.news
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
गुन्हे शाखे अंतर्गत कारवाई धारदार हत्यारांसह दरोडा, घरफोडी करणा-या टोळीस अटक करून टोळीकडुन सव्वाकिलो सोन्याचे दागिने, एक किलो चांदी, ०३ पिस्टल, १४ जिवंत राऊंड, चोरीची एकुण १० वाहने (०६ चारचाकी व ०४ दुचाकी वाहने) असा एकुण १,२२,४४,०००/- किं.चा मुददेमाल केला हस्तगत.
दि.०९/०९/२०२३ रोजी हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १३४५ / २०२३, भा.दं.वि.क. ३९५, ३९७, ५०४, ५०६,आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महाराष्ट्र पो. अधि कलम ३७ (१) (३) सह १३५ या गुन्हयातील आरोपी हे गुन्हयात वापरलेल्या पांढ-या रंगाच्या स्विफ्ट गाडीसह फुरसुंगी गावातील सोनार पुलाजवळील झाडींमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखा युनिट ३ ला प्राप्त झाली.
दिनांक २८/१०/२०२३((APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान .
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-3, युनिट-2, खंडणी विरोधी पथक-1 आणि दरोडा व वाहन चोरी पथक-1 ने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीत दरोडे आणि घरफोडीचे गुन्हे करणार्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 173 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून एकुण 1 कोटी 21 लाख 41 हजार 200 रूपयाचा ऐवज जप्त केल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (23, रा. बहात्तर वस्ती, पाण्याच्या टाकी जवळ, मांजरी), बच्चनसिंग जोगींदरसिंग भोंड (25, रा. गोसावी वस्ती, बिराजदार नगर, श्री साई सोसायटी समोर, लेन नं. 7, वैदवाडी, पुणे), रामजितसिंग रणजितसिंग टाक (रा. रामनगर, हडपसर), राहुलसिंग रविंद्रसिंग भोंड (रा. हडपसर), कणवरसिंग काळूसिंग टाक (रा. हडपसर), लखनसिंग राजपूतसिंग दुधाणी (रा. रामटेकडी, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तिकलसिंग गब्बरसिंग टाक (रा. रामटेकडी, हडपसर), अक्षयसिंग विहसिंग टाक (रा. हडपसर), करणसिंग रजपूतसिंग दुधाणी (रा. हडपसर), सोहेल जादेव शेख (रा. गोसावी वस्ती, हडपसर) आणि महेंद्रसिंग (रा. बीड) हे फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, खंडणी विरोधी पथक-1 चे वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, अजितकुमार पाटील, राजेंद्र पाटोळे, विकास जाधव, शाहीद शेख तसेच पोलिस अंमलदार संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, उत्तम तारू, गणेश ढगे, संजय भापकर, सयाजी चव्हाण, किरण ठवरे, दुर्योधन गुरव,संभाजी गंगावणे, किरण पवार, संजिव कळंबे, सुरेंद्र साबळे, सुजीत पवार, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, साई कारके, दिपक क्षीरसागर, राकेश टेकावडे, सतीश कत्राळे, प्रकाश कट्टे, निखिल जाधव, साईनाथ पाटील, प्रताप पडवाळ, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 98223315Z6

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad