वेल्हे पोलिसांची मोठी कामगिरी,१ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
वेल्हे पोलिसांनी तब्बल १ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला कौशल्यपूर्ण तपास करून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

वेल्हे पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६९/२०२५ अंतर्गत भा.दं.वि. कलम १४३, १४७, १४८, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नातील वादातून जमाव जमवून मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यातील इतर आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती.

मात्र मुख्य आरोपी विश्वनाथ धोंडीबा ढेबे (वय २९, रा. पोळेकर वस्ती, डोणजे, ता. हवेली, जि. पुणे) हा गेल्या ०९ वर्षांपासून फरार होता.फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस हवालदार सोमेश राऊत यांनी डोणजे परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, पो.हवा. सोमेश राऊत, पोलीस कर्मचारी राजेंद्र आवटे, मधुर जगताप तसेच इतर स्टाफ यांनी केली.फरार आरोपीला अटक करण्यात वेल्हे पोलिसांना यश आल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
