Breaking NewsCrime NewsPolice News

खडक पोलिसांची कामगिरी पोलिसांकडून गुटख्या दोन टेम्पोसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL N

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

खडक पोलीसांची अवैध गुटखा साठ्यावर कारवाई करून एकूण १०,२१,२००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त.

खडक पोलीस स्टेशनमध्ये नुकताच कार्यभार स्वीकारलेले मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काइंगडे व मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संतोष खेतमाळस यांनी स्वाकारलेले आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदयाचे अनुषंगाने ऑपरेशन ऑल-आऊट व ऑपरेशन वॉश-आऊट राबविण्यासाठी त्यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांना सूचना दिलेल्या आहेत,

त्या अनुषंगाने दिनांक १३/०७/२०२४ रोजी लोहियानगर परिसर व काशेवाडी परिसर येथील भागात मटका, जुगार, अवैध गुटखा, दारुचे धंदे यावावत माहिती घेण्याचे सूचित केले होते. त्या अनुषंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजित काइंगडे यांना त्यांचे गुप्त बातमीदराकडून बातमी मिळाली की, विराणी स्टीलची गल्लीमध्ये सोनमार्ग थेटरच्या समोर लोहीयानगर पुणे याठिकाणी टेम्पो क्र.१) MH- 12 JF1277 २) MH-12 LT 2620 यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत तंवाखु या मालाची एक इसम टेम्पोमध्ये विक्री करीत असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाली आहे,

अवैधपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन पॅगो टेम्पोवर खडक पोलिसांनी कारवाई करुन दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि.13) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास लोहीयानगर भागातील ( विराणी स्टील गल्लीमधील सोनमार्ग थिएटर समोर करण्यात आली.

अकिब शकील शेख (वय-32 रा. ए.पी. लोहीयानगर, पुणे) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275, 3(5) अन्न सुरक्षा मानके 30(2)(अ), 31(1), 26(2) (I), 26(2) (IV) प्रोहिबिशन अँन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार हर्षल चंद्रकांत दुडम (वय-42) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शनिवारी रात्री हद्दीत पेट्रोलींग करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना माहिती मिळाली की, सोनमार्ग थीएटर समोर दोन टेम्पोमध्ये अवैध गुटखा आहे. त्यानुसार तपास पथकाला कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पथक लोहीयानगर येथे गेले असता सोनमार्ग थिएटरसमोर दोन पॅगो टेम्पो उभारल्याचे दिसून आले. आरोपी त्यामध्ये गुटखा ठेवून लॉक करताना दिसून आला. पथकाने त्याठिकाणी छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला 6 लाख 17 हजार 700 रुपयांचा पानमसाला व सुगंधी तंबाखू (गुटखा), रोख रक्कम, चार लाख 1 हजार 500 रुपयांचे दोन टेम्पो असा एकूण 10 लाख 21 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक प्रल्हाद डेंगळे करीत आहेत,

ही कारवाई पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे व पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, लखन ढावरे, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, भालचंद्र दिवटे, दिनेश अवघडे यांच्या पथकाने केली.

(विश्वजीत काइंगडे) वरिष्ठ पोलीस निरिक्षक खडक पोलीस स्टेशन. पणे शहर

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *