Breaking NewsPolice News

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला केली अटक,ग्रामीण पोलिसांची कामगिरी,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

४८ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. एकूण १४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

लोणावळा : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी पुणे- मुंबई महामार्गावर गांजा विक्रीसाठी आली होती. ४८ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. एकूण १४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गेल्या काही दिवसांपासून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्याकडून अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई सुरू आहेत. नितीन शिवाजी लेहणे, संदीपान गुट्टे आणि गणेश सुरेश दराडे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून लोणावळा परिसरात गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांनावर पोलिसांची करडी नजर आहे. नशा मुक्तीच्या संदर्भात अभियान देखील लोणावळा पोलीस चालवत आहेत. लोणावळा परिसरातील कार्ला येथे जुना पुणे – मुंबई महामार्गावर काही जण गांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती.

पोलिसांचे एक पथक त्या रात्री गस्त घालत होते. सापळा लावून ते हॉटेल तेजस येथे थांबले. पहाटे तीन च्या सुमारास काही संशयित चारचाकी गाडीतून आले. साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना हटकले.तिघे जण उडवाउडवीची उत्तरे देत होती. अखेर त्यांच्या चारचाकी गाडीची पंचासमक्ष पोलिसांनी झडती घेतली. गाडीच्या डिक्कीत दोन गोणीमध्ये ४८ किलो गांजा मिळाला. ४८ किलो गांजा आणि गाडीसह एकूण १४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तीनही आरोपींवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस ऍक्ट १९८५ च्या कलमानुसार ८ (क), २० (ब) आणि (क), २९ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *