Breaking NewsCrime NewsPolice News

पिंपरी:आरोपीला सुटकेसाठी बनावट जामीन सादर,वकिलासह इतरांवर गुन्हा दाखल,पिंपरी पोलीस स्टेशनची कामगिरी apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पोलीस उपनिरीक्षक रविंद्र मुदळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना निगडी पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या सुटकेसाठी न्यायालयाने स्थानिक जामीनदार, नातेवाईक व त्यांचे फोन नंबर सादर करण्यास सांगितले होते. आरोपींनी फिर्यादी यांचे बनावट आधार कार्ड तयार करुन ते न्यायालयात सादर करुन वकीलांमार्फत जामीन घेऊन तो पोलिसांना सादर केला. मात्र, फिर्यादी बनसोडे हे स्वत: न्यायालयात हजर नसतानाही त्यांच्या आधार कार्डचा वापर करुन आरोपींना जामीन देऊन न्यायालय व फिर्यादी यांची फसवणूक केली.

कायदेशीर न्याय मिळवून देणाऱ्या वकिलानेच कायदा धाब्यावर बसवून घुसखोर बांगलादेशी नागरिकांच्या सुटकेसाठी बनावट जामीन पोलिसांना सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी वकीलासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडे दहा ते सहाच्या दरम्यान प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पिंपरी न्यायालय येथे घडली होती.याबाबत राहुल बबन बनसोडे (रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी शुक्रवारी (दि.19) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आरोपीला जामीन देण्यासाठी कर्टात हजर असलेले वकील आणि आरोपीच्या जामीनासाठी वकीलाच्या संपर्कात असलेले नातेवाईक अगर मित्र (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 465,469,471,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, राहुल बनसोडे यांनी आरोपींच्या जामिनाबाबत न्यायालयात जाऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान फिर्यादी यांचे आधार कार्ड न्यायालयात स्थानिक जामिनदार म्हणून सादर केल्याचे आढळून आले. मात्र, बनसोडे यांनी अशा प्रकारचे कोणतीही कागदपत्रे आरोपींना दिली नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले . त्यानंतर बनसोडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात येऊ घडलेला प्रकार सांगितला. आरोपींनी फिर्य़ादी यांचे बनावट आधार कार्ड बनवून जामीन घेतला. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन आरोपींना जामीन मिळवून देण्यास मदत करणाऱ्या वकीलावर आणि इतरांवर गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. पुढील तपास पीएसआय रविंद्र मुदळ करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in

:-


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *