स्वातंत्र्यदिनी शाळेत मुलीवर लैंगिक अत्याचार; चुडामणी तालीम भवानी पेठतील शाळेमधील स्वच्छतागृहात घडला प्रकार,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे : स्वातंत्र्यदिनी शाळेत मुलीवर लैंगिक अत्याचार; भवानी पेठेतील शाळेमधील स्वच्छतागृहात घडला प्रकार,apcs.in
Pune: बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याच्या घटनेचे पडसाद बदलापूरमध्ये उमटत असतानाच दुसरीकडे पुण्यात देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे,पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा घटना सातत्याने समोर येत असल्यामुळे पालक आपल्या चिमुरड्या मुलांना शाळेत पाठवताना कोणाच्या विश्वासावर पाठवायचं असा संतप्त सवाल करत आहेत.

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेमध्ये आलेल्या ११ वर्षीय मुलीला एकटे गाठत जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढून नेत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना भवानी पेठेमधील एका नामांकित शाळेमध्ये घडली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. १५ ऑगस्टच्या दिवशीच हा प्रकार घडला.
देवराज पदम आग्री (वय १९, रा. न्यू मोदी खाना, लष्कर) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता ७४७४, ७५ (१) (i), बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याला अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या ३० वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. समर्थ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भवानी पेठ परिसरात ही नामांकित शाळा आहे. पिडीत मुलगी १५ ऑगस्टच्या दिवशी शाळेतील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. हा कार्यक्रम संपल्यानंतर ती दुसऱ्या मजल्यावर तिची स्कूल बॅग शोधण्यासाठी जात होती.

यावेळी आरोपी मुलगा हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ उभा होता. त्याने पीडित मुलगी जवळ येताच तिचा जबरदस्तीने हात पकडला. तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत नेले. यावेळी आरोपीने तरुणाने तिच्याशी अश्लील कृत्य करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला. पीडित अल्पवयीन मुलीने आपली कशीबशी सुटका करीत तेथून पळ काढला. घरी केल्यानंतर तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दाखल केली. समर्थ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. याप्रकरणाचा पूढील तपास उपनिरीक्षक माने करीत आहेत.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
