खडकमाळ कार्यालयातील महिला कर्मचार्‍याविरूध्द ६ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

६ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

०६/१२/२०२२ गुन्हा दाखल दिनांक :- २१/०१/२०२३.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

थोडक्यात माहिती :- यातील तक्रारदार यांनी त्यांचे मालमत्तेची (घर व जागा) वारसनोंद घेण्यासाठी हवेली सिटी सर्व्हे कार्यालया अंतर्गत खडकमाळ कार्यालयातील परिरक्षण भुमापक यांना भेटुन कागदपत्रांची पुर्तता केली होती. त्यानंतर त्या कार्यालयातील कंत्राटी काम करणा-या महिला कर्मचारी | श्रीमती लक्ष्मी लावरे यांनी ती नोंद घेण्यासाठी त्यांच्यासाठी व परिरक्षण भुमापक यांच्यासाठी १०,०००/- रुपये लाच मागणी केल्याची तक्रार ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

हवेली सिटी सर्व्हे कार्यालयाच्या अंतर्गत असेलेल्या खळकमाळ कार्यालयात कंत्राटी पध्दतीने काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यावर ६ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी लावरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की , तक्रारदार यांनी त्यांच्या मालमत्तेची (घर व जागा) वारसनोंद घेण्यासाठी हवेली सिटी सर्व्हे कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या खडकमाळ कार्यालयातील परिरक्षण भुमापक यांना भेटून कागदपत्रांची पुर्तता केली होती. त्यानंतर कंत्राटी काम करणार्‍या महिला कर्मचारी लक्ष्मी लावरे यांनी ती नोंद घेण्यासाठी त्यांच्यासाठी व परिरक्षण भुमापक यांच्यासाठी १० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. 

प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये तक्रारदार यांच्या मालमत्तेच्या वारस नोंदीसाठी लक्ष्मी लावरे यांनी तडजोडीअंती त्यांच्या स्वतःसाठी व परिरक्षण भुमापक यांच्यासाठी ६ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ला. प्र. वि. पुणे युनिटच्या पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर तपास करत आहेत.

शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.

१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *