प्रेम प्रकरणातून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगडच्या पायथ्याच्या गोळेवाडी येथील.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सिंडगड परिसरातील लॉजवर प्रेयसी समोर घेतलेल्या फाशीला लागले वेगळे वळण; आत्महत्या नव्हे तर घातपात झाल्याचा साकिबच्या परिवाराचा आरोप.

साकिबच्या परिवाराची पुणे ग्रामीण अधीक्षक अंकित गोयल यांच्याकडे तीन पाणी लेखी तक्रार दाखल.

पीआय सदाशिव शेलार यांनी म्हणणे ऐकून न घेतल्याचा आरोप.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

प्रेम प्रकरणातून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगडच्या पायथ्याच्या गोळेवाडी येथील किनारा लॉजवर १६ ऑक्टोबर २०२२ रोजी घडली होती. साकिब लतीफ इनामदार वय २५ असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव होते. तुझं आता दुसऱ्याशी लग्न जमलंज्ञआहे, तर मग मी जगून काय करू,असं म्हणत साकिबने माधुरीचे ओढणीने गळफास घेत जीवन संपवल्याने शहरात खळबळ उडाली होती. साकिब आणि माधुरीचे गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांतच प्रेयसीचा विवाह दुसऱ्यासोबत होणार
होता. यावरून प्रियकर आणि प्रेयसीमध्ये वाद सुरू होते. यावरच बोलण्यासाठी ते रविवारी सकाळी १६ ऑक्टोबर ला सिंहगड पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील किनारा लॉजवर भेटले होते. त्यानंतर प्रियकर साकीब याने तुझे लग्न आता दुसऱ्याशी होणार आहे मी जगून तरी काय करू? असे म्हणत सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्रेयसी समोरच तिच्याच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी साकिबच्या परिवाराला साकिबच्याच आयफोन मोबाईल वरून संपर्क साधून सदरील घटनेची माहिती दिली होती. तर त्याच्या घरच्यांनी आक्षेप घेतला असता पीआय सदाशिव शेलार यांनी तुम्ही अंत विधी पार पाडल्यावर या गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले होते. तर पोलिस अशोक तारू यांनी साकिबचा व प्रेयसीचा सीडीआर काढला होता. परंतु माधुरीचा सीडीआर हा १५ दिवसांचा न दाखवता फक्त एकच दिवसाचा दाखवला होता. तर त्यानंतर वारंवार भेटूनही हवेली पोलिसांनी दाद दिली नसल्याचा आरोप देखील साकिबच्या परिवाराने केला आहे. तर तक्रार करताना परिवाराने एकुण २३ मुद्दे उपस्थित केले असून ही आत्महत्या नसून साकिबचा घातपात केल्याचा आरोप त्याच्या आईने तक्रारीत केला आहे. या विषयावर ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल काय भुमिका घेणार याकडे पुणेकरांचे लक्ष राहणार आहे.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *