शिक्षा भोगलेल्या, सराईत तडीपार, रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा, पाठलाग करून त्याचे कडून मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट -2 कडून जप्त करण्यात आले .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

शिक्षा भोगलेल्या, सराईत तडीपार, रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा, पाठलाग करून त्याचे कडून दोन पिस्टल, तीन गावठी कट्टे ,व 3 राऊंड असा एकूण 1,41,000 मुद्देमाल जप्त करून, गुन्हे शाखा युनिट -2 कडून करण्यात आले जेरबंद.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्र दाखवून लुटमारीचे प्रकारात वाढ झाली असून, सदर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे युनिट -2 कडील प्रभारी अधिकारी श्री. क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, विशाल मोहिते, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस उपनिरीक्षक,नितीन कांबळे व स्टाफ असे युनिट -2 हद्दीत पेट्रोलिंग फिरत असताना, सेंट्रल स्ट्रीट चौकीजवळ आले असता.


पो शि 10743 कादिर शेख व पो शि 8409 समीर पटेल यांना बातमीदारा मार्फतीने बातमी मिळाली की, समर्थ पोलीस स्टेशन कडून तडीपार केलेला इसम रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण हा खड्डा गॅरेज मंगळवार पेठ पुणे. येथे जवळ पिस्टल बाळगून थांबलेला आहे. त्यानंतर युनिट प्रभारी श्री क्रांतीकुमार पाटील यांनी आदेश दिले असता सदर इसमास नमूद ठिकाणी जाऊन त्याचा पाठलाग करून दिनांक 15/ 9 /2022 रोजी ताब्यात घेतले. त्यास नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण राहणार 207 सोमवार पेठ पुणे 11 दारूवाला पूल श्रेयश अपार्टमेंट सध्या रा वेणू आपार्टमेंट तिसरा मजला निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड पुणे असे सांगितले.

सदर आरोपी पुणे पोलीस अभिलेखा वरील गुन्हेगार असून त्याचे वर जबरी चोरी शरीराविरुद्ध गुन्हे करणारा असून त्याचे वर पुणे शहरात आर्म अॅक्ट व जबरी चोरीचे 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत तसेच एका गुन्ह्यात पाहिजे आरोपी असून समर्थ पोलीस स्टेशन कडून पुणे जिल्ह्यातून तडीपार आहे.

1) येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजी क्रमांक -584 /2022 भादविक 427, 504 आर्म अॅक्ट 4/25, मपो अॅक्ट 37(1)3 सह135

2) सांगवी पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक 284/ 2022 ,भादविक- 452, 509, 143, 147, 149, 323, क्रिमिनल लॉ अँमेंनटमेंनट कलम 1932 चे कलम 7

3) समर्थ पोलीस स्टेशन येथून पोउपआय परी -2 यांचे कडील आदेश क्रमांक 10 /21 अन्वये 22/ 2/ 21.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे श्री गजानन टोम्पे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा युनिट -२ पुणे शहर, सपोनि विशाल मोहिते, पोउपनिरी राजेंद्र पाटोळे, नितीन कांबळे, पोलीस अंमलदार, शंकर विनोद चव्हाण, गणेश थोरात राहुल राजपुरे, संजय जाधव, गजानन सोनुने, विजयकुमार पवार, प्रमोद कोकणे, उज्वल मोकाशी, उत्तम तारू, समीर पटेल ,कादिर शेख, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, नागनाथ राख, या पथकाने केलेली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *