पिस्टल लावुन फिरणाऱ्या सराईतास खडक पोलीसांनी ठोकल्या बेडया .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

खडक पोलीस स्टेशन , पुणे शहर

भरवस्तीत कंबरेस पिस्टल लावुन फिरणाऱ्या सराईतास पोलीसांनी ठोकल्या बेडया .

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

दिनांक २४/०९ /२०२२ रोजी कासेवाडी पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी नितीनकुमार नाईक , पोलीस अंमलदार तेजस पांडे तसेच तपास पथकातील अधिकारी पोलीस अमंलदार संदीप तळेकर , विशाल जाधव हे खडक पोलीस ठाणे हद्दीत आगामी नवरात्री उत्सवाचे अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना सपोनि नाईक यांना त्यांचे गुप्त बातमीदारा व्दारे बातमी मिळाली की ,

खडक पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषीकेश ऊर्फ सोन्या संदिप मंडलिक , वय २६ वर्षे , रा .५४ / बीपी / लोहीयानगर , पुणे सध्या , कात्रज कोंढवा बायपास रोड , निंबाळकर वस्ती , प्रकाश कदम यांचे बंगल्याजवळ , पुणे हयाचे कंबरेला एक पिस्टल असुन तो नेहरु रोडवर सोनवणे हॉस्पीटल शेजारील बसस्टॉप जवळ थांबलेला आहे

.

सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव खडक पोलीस स्टेशन पुणे शहर यांना सांगितली . त्यांनी योग्य ती काळजी घेवुन बातमीची खात्री करून कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या .

खडक पोलीस स्टेशन सहा पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक

सुचनेप्रमाणे सपोनि नाईक व सोबतचे स्टाफचे मदतीने नेहरू रोडवर सोनवणे हॉस्पीटल शेजारील बसस्टॉप जवळ जावुन खात्री करता रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषीकेश ऊर्फ सोन्या संदिप मंडलिक हा पोलीसांना दिसुन आल्याने त्यास झडप घालुन पकडण्यात आले . यास पुर्ण नाव / पत्ता विचारता त्याने त्याचे नाव ऋषीकेश ऊर्फ सोन्या संदिप मंडलिक , वय २६ वर्षे , रा .५४ / बीपी / लोहीयानगर , पुणे सध्या , कात्रज कोंढवा बायपास रोड , निंबाळकर वस्ती , प्रकाश क यांचे बंगल्याजवळ , पुणे असे सांगितले , त्याची अंगझडती घेता त्याचे कंबरेस मागील बाजुस ६०,००० /- रुपये , एक देशी बनावटीचे लोखडी स्टील बॉडी असलेले पिस्टल ,मॅगझीनसह व ५,०००/ -रुकिं चे ०५ जिवंत काडतुसे मिळुन आले असुन त्याचेचर पोलीस अंमलदार तेजस पांडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

सदर गुन्हयाचा तपास नितीनकुमार नाईक , सहा पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन है । करीत आहेत . १ नमुद सर्व कारवाई ही मा . पोलीस आयुक्त , पुणे शहर , श्री अमिताभ गुप्ता , मा . पोलीस सह आयुक्त , श्री . संदीप कर्णिक मा . अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री . राजेंद्र डहाळे , मा . पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ डॉ . प्रियंका नारनवरे , व मा . सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग श्री . सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता यादव , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) श्री . राजेश तटकरे , सहा पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक , सहा पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोलीस अंमलदार तेजस पांडे , संदिप तळेकर , विशाल जाधव यांचे पथकाने केली आहे .

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *