Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice News

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत,बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार,


तीन नराधमांनी महाविद्यालयीन तरुणीला केली मारहाण,

पुणे,कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. मित्रासह बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळ घटना समोर आली आहे.ही घटना साधारणपणे गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.गंभीर जखमी असलेल्या मुलीला तिच्या मित्राने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातून पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आल्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही मुलगी परराज्यातील आहे. ती २१ वर्षांची असून या ठिकाणी असलेल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती आणि तिचा मित्र गुरुवारी रात्री अकरा वाजता सुमारास बोपदेव घाटामध्ये गेले होते. त्यावेळी तीन अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले. जबरदस्तीने या मुलीला ताब्यात घेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिचा मित्राला मारहाण करण्यात आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण निर्मनुष्य आहे.

पोलीस ठाण्याला साधारणपणे शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या संदर्भात रूग्णालयाकडून माहिती कळविण्यात आली. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या आणि पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला सूचना करण्यात आल्या असून त्यांची पथके देखील आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आलेली असल्याचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *