Police News

स्वतःवर गोळी झाडून घेत पोलीस कर्मचाऱ्याने लोहिया नगर पोलीस चौकी मध्ये केली आत्महत्या,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे शहर पोलीस दलाच्या खडक पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी (५ एप्रिल) दुपारी लोहिया नगर पोलीस चौकी मध्ये या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत सकाळी आत्महत्या केली.

भरत दत्ता आस्मर असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून पोलीस चौकीमध्ये कोणी नसताना एका खोलीमध्ये हा कर्मचारी गेला. ही खोली त्याने दार लावून बंद केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली. साधारणपणे आठ-दहा वर्षांपूर्वीच हा कर्मचारी पोलीस दलामध्ये भरती झाल्याचे सांगण्यात येते.मात्र, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. थेट पोलीस चौकीमध्येच एखाद्या कर्मचाऱ्यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.दरम्यान, आस्मर हे खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहिया नगर पोलीस चौकी येथे रात्रपाळी ड्युटीवर होते. त्यांनी कार्बाइन मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

पोलिसांच्या आत्महत्या वाढत आहेत…

पोलिस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत ज्यात पोलिसांना राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करावे लागते. दबावात त्यांना कधीकधी त्यांच्या कर्तव्याशी आणि त्यांच्या सन्मानाशी तडजोड करावी लागते. काही पोलिसांना हे सहन होत नाही आणि ते नोकरी सोडतात किंवा अशी टोकाची पावले उचलतात. अनेक घटनांमध्ये असे दिसून आले आहे की, पोलिस कर्मचारी तक्रार करतात की त्यांना खूप दबावाखाली काम करावे लागते. 24 तासांत केव्हाही ड्युटीवर हजर राहणे. सण-उत्सवात रजा नाही, प्रोत्साहनाचा अभाव. पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे शोषण हे देखील यातील एक कारण असू शकते.?

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *