रेमडीसीवर इंजेक्शनाचा काळाबाजार करुन चढया किंमतीत विक्री करणारा फार्मासिस्ट कोंढवा पोलीसकडुन अटक

असाच एक प्रकार पुन्हा कोंढवा पोलीसांनी उघडकीस आणला आहे.

स्वतःचे फायदयाकरीता डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन शिवाय विक्री करुन फसवणुक.

रेमडीसीवर इंजेक्शनाचा काळाबाजार करुन चढया किंमतीत विक्री करणारा फार्मासिस्ट कोंढवा पोलीसकडुन अटक दि .२१ / ०४ / २०२१ रोजी कोंढवा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) शब्बीर सय्यद यांना ” अंकित विनोद सोलंकी नावाचा इसम हा जायका हॉटेल कोंढवा येथे कोराना १९ रुग्णांना अत्यावश्यक असणारे रेमडिसीवर इंजेक्शन हे विनापरवाना चढ्या दराने विक्री करत आहे . ” अशी बातमी प्राप्त झाली होती . त्यानुसार पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) शब्बीर सय्यद यांनी साध्यावेशामध्ये तपास पथक अधिकारी प्रभाकर कापुरे व पोलीस अंमलदार यांचे छापा पथक तयार करून बनावट गिन्हाईक यास अंकित विनोद सोलंकी याच्याकडे रेमडिसीवर इंजेक्शन घेणेकामी पाठविले . सदर रेमडिसीवर इंजेक्शन विक्री करणारा इसम अंकित विनोद सोळंकी वय -२६ वर्ष , धंदा- फार्मासिस्ट , रा . फ्लॅट नं -३०१ , सुखवानी कॉम्पलेक्स , ११ नं बस स्टॉप मागे , दापोडी , पुणे हा जायका हॉटेलच्या जवळ येवुन आडबाजुस बनावट ग्राहकास घेवुन जावुन त्यास दोन इंजेक्शन दाखवुन , एका इंजेक्शनसाठी १०,००० / – रु मागणी केली . तसेच एका इंजेक्शनची १०,००० / – रु रोख रक्कम स्विकारुन १०,००० / – रु रक्कम ऑनलाईन स्वरुपात मागणी करत असताना त्यास छापा टाकुन ताब्यात घेतले . त्याच्याकडे रेमडिसीवर इंजेक्शनाबाबत तपास केला असता त्याने सदर रेमडिसीवर इंजेक्शन हे डॉक्टरांनी ज्या पेशन्टला आवश्यकता आहे , त्यांना प्रिस्क्रीप्शन लिहुन दिलेले असते , ते प्रिस्क्रीप्शन चोरी करुन त्याचा गैरवापर करुन ससुन हॉरपीटल येथील संजीवनी मेडिकल स्टोअर्स मधुन खरेदी केले असल्याचे सांगितले . तसेच ते इंजेक्शन चढया भावामध्ये काळयाबाजार विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली असल्याने त्याच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे येथे गुरन .३३५ / २०२५ , भादंवि कलम ४२० सह परिच्छेद -२६ औषध किंमत नियंत्रण आदेश -२०१३ , सह वाचन कलम ३ ( २ ) ( सी ) जीवनावश्यक वस्तुंचे अधिनियम -१९ ५५ चे उल्लंघन दंडनिय कलम -७ ( १ ) ( ए ) ( २ ) तसेच औषध व सौंदर्य प्रसाधणे कायदा -१९ ४० चे कलम १८ ( सी ) चे उल्लंघन दंडनिय कलम २७ ( थी ) ( २ ) , कलम -१८ ए व कलम २२ ( ए ) ( सीसीए ) चे उल्लंघन अनुक्रमे दंडनिय कलम २८ न कलम २७ डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास चालु आहे .

तर काहीजण आपल्या फायद्यासाठी रेमडिसिवर इंजेक्शन काळाबाजारात विकत असल्याचे दिसून येत आहे.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *