गॅस सिलेंडर आणि व्हिडिओ गेम या दोघांवर सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने केली कारवाई . एकुण ९ ,७६,०१६ / – रु किं चा मुद्देमाल जप्त

ACS POLICE CRIME SQUAD

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय

दिनांक २७/०८/२०२१ ” सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने विनापरवाना घरगुती वापराच्या तसेच कर्मशियल गॅस सिलेंडर मधून दुस – या रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस काढून घेवुन गॅसची चोरी करून काळाबाजार करणाऱ्या तसेच व्हिडीओ गेम पार्लरमध्ये आकड्यावर पैसे लावुन पैशावर जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या इसमांवर कारवाई केलेबाबत . “

मा . पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक २५/०८/२०२१ रोजी चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनापरवाना अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना घरगुती वापराच्या तसेच कर्मशियल गॅस सिलेंडर मधून दुस – या रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस काढून घेवुन गॅसची चोरी करून काळाबाजार करणाऱ्या तसेच विनापरवाना अवैधरित्या व्हिडीओ गेम पार्लरमध्ये पैशावर स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी आकड्यावर पैसे लावुन जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली आहे . दिनांक २६/०८/२०२१ रोजी चाकण पोलीस ठाणे हद्दीत मच्छी मार्केट माणिक चौक , चाकण येथील सोमेश्वर स्टील सेंटर अॅन्ड गॅस सर्व्हिस सेंटर या दुकानाचा मालक राजेंद्र पवार हादुकानाचे पाठीमागिल रुममध्ये घरगुती वापराचे गॅस सिलेंडर टाकीमधून गॅस चोरून छोट्या ३.६ किलो गॅस सिलेंडर टाकीमध्ये गॅस भरत आहे . अशी गुप्त बातमीदारकडुन मिळालेल्या माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी चाकण पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचुन छापा टाकला असता आरोपीच्या ताब्यात मिळुन आलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे .

१ ) ४६,६२० / -रु रोख रक्कम

२ ) १,३३३ / – रू किं . गॅस भरण्याचे साहित्य

३ ) ५,००० / – रू . कि . चा एक इलेक्ट्रिक वजन काटा

४ ) २.६०,०७६ / – रु.कि. गॅस सिलेंडर

५ ) ५.९०,००० / – रु किं ची एक महिंद्रा बोलेरो पिक – अप जु.वा.किं .अं . असा एकुण ९ ,०२.९९६ / – रु . किं . चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन इसम नामे

१ ) राजेंद्र काशिनाथ पवार वय ६० वर्षे रा . बालाजीनगर , चाकण ता.खेड , जि . पुणे . ( दुकान मालक )

२ ) किरण मारूती पवार वय २५ वर्षे रा . सहारा आरचुड सोसायटी , चाकण ता.खेड जि.पुणे .

बोलेरो पिकअप ड्रायव्हर यांनी संगनमत करून बेकायदेशीररित्या एका सिलेंडर मधून दुस – या सिलेंडर मध्ये गॅस भरून लोकांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण होईल हे माहिती असुन सुद्धा मानवी जिवीतास कोणत्याहि संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यास पुरेसा बंदोबस्त करणे गरजेचे असताना गॅस सारख्या ज्वलनशील पदार्थाबाबत पुरेसा इतका बंदोबस्त करण्याचे जाणीव पुर्वक टाळून त्याचे ताब्यातील घरगुती वापराच्या तसेच कर्मशियल गॅस सिलेंडर मधून दुस – या रिकाम्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस काढून घेवुन गॅसची चोरी करताना मिळून आले . म्हणुन त्यांचे विरुध्द चाकण पोलीस ठाणे येथे

गुरनं १०४२/२०२१ भादंवि कलम ३७९ , ४२० , २८५ सह जिवनावश्यक वस्तूचा कायदा सन १९५५ चे कलम ३,७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करीत आहे . तसेच दिनांक २६/०८/२०२१ रोजी सामाजिक पथकाने दुस – या कारवाईमध्ये वाकड पोलीस ठाणे हद्दीत सर्व्हे नं ४७/१/११ श्रीनगर , रहाटणी फाटा चौक , काळेवाडी , पुणे . येथे लकी व्हिडीओ गेम पार्लर या बंदिस्त जागेत इसमनामे अली दस्तगिर पटेल हे त्यांचेकडे कोणताहि परवाना नसताना त्यांचे व्हिडीओ गेम पार्लर मध्ये गि – हाईक यांना मास्टर मेगा फ्रि प्ले या व्हिडीओ गेम मशिनवरील आकड्यावर पैसे लावण्यास सांगुन ५० / रुपयास १०० / – रुपये देवुन पैशावर स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी हार जीतचा जुगार खेळत व खेळवित आहे . अशी गुप्त बातमीदारकडुन मिळालेल्या माहितीवरुन सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वाकड पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचुन छापा टाकला असता मुद्देमाल आरोपीच्या ताब्यात मुद्देमाल मिळुन आला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे .

१ ) ७०,००० / – रु . कि.च्या विविध कंपनीच्या ०७ व्हिडीओ गेम मशिन

२ )३,०२० / – रू रोख रक्कम असा एकुण ७३,०२० / – रू.कि. चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन

१ ) अली दस्तगिर पटेल वय ३० वर्षे रा . जय मल्हारनगर , थेरगाव पुणे ( व्हिडीओ गेम चालक मालक )

२ ) राहुल मल्लेश राठोड वय २० वर्षे रा . पाण्याचे टाकीजवळ थेरगाव पुणे . ( जुगार खेळी )

३ ) देवा मोहन चव्हाण वय २८ वर्षे रा . सदर ( जुगार खेळी )

यांचे विरुद्ध वाकड पोलीस स्टेशन गु.र.नं ७१५/२०२१ महा.जुगार अधिनियम १८८७ चे कलम ४,५ प्रमाणे गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन करीत आहे . वरिल दोन्ही कारवाईमध्ये एकुण ९ ,७६,०१६ / – रु किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री . कृष्ण प्रकाश , मा . अप्पर पोलीस आयुक्त , श्री . डॉ . संजय शिंदे , मा . पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -२ अति . कार्यभार पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) श्री . आनंद भोईटे , मा . सहा . पोलीस आयुक्त श्री . डॉ . प्रशांत अमृतकर , सपोनि डॉ . अशोक डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे , पोउनि धैर्यशिल सोळंके पोलीस अंमलदार विजय कांबळे , संतोष बर्गे , सुनिल शिरसाट , नितीन लोंढे , भगवंता मुठे , अनिल महाजन , संगिता जाधव , मारुती करचुंडे , गणेश कारोटे , राजेश कोकाटे , सोनाली माने यांनी केली आहे . ( आनंद भोईटे ) पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -२ अतिरिक्त कार्यभार पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे ) पिं.चिं .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *