Traffice Police

खंडणी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , ची कारवाई


ACS POLICE CRIME SQUAD

CRIME REPORTER RAEES KHAN

दिनांक – २६/०८/२०२१ खंडणी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , पुणे शहर गारवा विर्याणी हॉटेल , धायरी , पुणे चे मालकांवर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करुन दहशत पसरविणा – या आरोपींच्या आवळल्या मुसक्या

ONLINE PORTAL NEWS

दिनांक २१/०८/२०२१ रोजी दुपारी ४ वाजण्याचे सुमारास गारवा बिर्याणी हॉटेल , गणेशनगर , धायरी , पुणे येथे गारवा बिर्याणी हॉटेलचे मालक – कर्मचारी तसेच इसम नामे ओंकार सातपुते व संकेत मिरगल रा . धायरी पुणे यांचेमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरुन इसम नाम अनिकेत जाधव , वैष्णव / बापु झांबरे महेश संजय उबाळे , ओंकार सातपुते व संकेत मिरगल रा . सर्व धायरी , पुणे यांनी गारवा बिर्याणी हॉटेल धायरी , पुणे मध्ये घुसुन हॉटले मालक व कामगार यांना लोखंडी कोयत्याने , बिर्याणीचे मोकळे पातीले , झाकणे , खुर्चा , ट्रे ने मारुन जिवेठार मारण्याचा प्रयल , दमदाटी व दहशत केल्याने सिंहगडरोड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३५१/२०२१ भादंवि कलम ३०७ , ३२३ , ५०४ , १४३ , १४४,१४५ . १४७ , १४८ , १४९ , आर्म अॅक्ट ४ ( २५ ) , म.पो.का कलम ३७ ( १ ) सह १३५. क्रिमीनल लॉ अॅक्ट कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा दाखल झालेपासून दाखल गुन्हयांतील आरोपी फरारी होते . दिनांक २५/०८/२०२१ रोजी खंडणी विरोधी पथक १ , गुन्हे शाखा , पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्हयातील पाहिजे , फरारी , तडीपार आरोपींचे शोध घेणेकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार रमेश चौधर व गजानन सोनवलकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , सिंहगडरोड पोलीस ठाणे , पुणे शहर गु.र.नं. ३५१/२०२१ मधील पाहीजे आरोपी नामे १ ) ओमकार संतोष सातपुते २ ) तेजस गणेश निवंगुणे ३ ) अनिकेत विनायक जाधव हे त्यांची ओळख लपवून मु.पो. वाल्हे , ता . पुरंदर येथील महादेव मंदिर , डोंगर परिसरात जावून लपून बसले आहेत . सदर माहितीची खातरजमा करणेसाठी मा . पोलीस उपायुक्त , गुन्हे शाखा , पुणे शहर यांचे परवानगीने खंडणी विरोधी पथक १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वर नमूद ठिकाणी जावून आरोपींचा शोध घेतला असता आरोपी नामे १ ) ओमकार संतोष सातपुते वय – १८ वर्षे , रा . धायरी गारमळा , गणतपी ज्वेलर्सच्या मागे , धायरी , पुणे २ ) तेजस गणेश निवंगुणे वय – २० वर्षे रा . श्रीराम संकुल ए विंग , मुरली हॉटेल मागे , धायरी गाव , पुणे व ३ ) अनिकेत विनायक जाधव वय – २१ वर्षे रा . धायरी गारमळा , रायबा हॉटेल शेजारी , धायरी गाव , पुणे हे सदर ठिकाणी मिळून आल्याने आरोपींना सदर ठिकाणाहून ताब्यात घेवून पुढील तपासकामी सिंहगड रोड पोलीस ठाणे , पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे .

सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री . अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , पोलीस उपआयुक्त ( गुन्हे ) श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ , श्री.सुरेंद्रनाथ देशमुख , यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ , गुन्हे शाखेचे व.पो.नि. श्री महेंद्र जगताप , स.पो.नि. श्री . संदीप बुवा , पोलीस अमंलदार पांडुरंग वांजळे , अतुल साठे , नितीन कांबळे , रमेश चौधर , गजानन सोनवलकर , दुर्योधन गुरव , अमर पवार , विजय कांबळे , हनुमंत कांदे यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *