अंदाजपत्रकात नागरिकांच्या सूचनांना स्थान देण्याची मागणी असलम इसाक बागवान यांनी पत्रकाद्वारे ही मागणी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

अंदाजपत्रकात नागरिकांच्या सूचनांना स्थान देण्याची मागणी असलम इसाक बागवान यांनी पत्रकाद्वारे ही मागणी केली आहे.

ONLINE PORTAL NEWS ONLY

पुणे महानगरपालीकेच्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात विकासकामांच्या संदर्भात नागरिकांच्या सूचनांना स्थान देण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केल्यावर स्थायी समिती अध्यक्ष,नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांच्या ‘स ‘ यादीतील अनावश्यक कामांसाठी पुणेकर करदात्यांचा पैसा उधळू नये.सार्वजनिक स्वच्छतागृहे,कचरा नियोजन व व्यवस्थापन,छोट्या बाजारपेठा,वाहनतळ,मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक तरतूद करावी,असे ‘इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप ‘ च्या वतीने अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी पत्रकाद्वारे ही मागणी केली आहे.

‘गरीब-श्रमिक वर्गामध्ये ज्या सोयीसुविधांचा अभाव आम्हाला जाणवतो त्यांच्या पूर्ततेसाठी धोरणात्मक निर्णय घेतले जावे व त्यासाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद केली जावी,कोरोना साथीनंतर पालिकेची अर्थव्यवस्था अजून सुधारलेली नाही हेही लक्षात घ्यावे’,असे या पत्रकात म्हटले आहे.

‘इनक्रेडिबल समाजसेवक गृप ‘ ने सुचविलेली कामे पुढीलप्रमाणे :

  1. मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक तेवढी तरतूद – कोविडच्या काळात एकूणच जनजीवन विस्कळीत झाले ते अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. अद्यापही रोजगार संपूर्णपणे सुरू झाला नाही. हजारो लोक बेरोजगार झालेले आहेत. अशा स्थितीत, अन्न (रेशन), आरोग्य सेवा, शिक्षण व शैक्षणिक सुविधा आणि रोजगारसंधी याबाबत लोकाभिमुख निर्णय घेऊन या सेवांच्या कक्षेत जास्तीत जास्त नागरिक येतील व त्यांना त्या योग्य रीतीने पुरवल्या जातील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यास बजेटमध्ये तरतूद व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेचे गाडे पूर्ववत होईपर्यंत अनावश्यक अथवा पुढे ढकलता येणाऱ्या खर्चास कात्री लावूनही या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करावा अशी मागणी आहे.
  2. महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे – महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था करावी. खास करून नव्याने विकसित होत असलेल्या कोंढवा खु., कोंढवा बु., हडपसर, येरवडा, नऱ्हे, आंबेगाव, उंड्री, अशा भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नाही, ती लवकरात लवकर केली जावी. तसेच आज शहरात विशेषत: रस्तारुंदीमुळे अनेक ठिकाणची स्वच्छतागृहे पाडण्यात आली आहेत. ती पुन्हा बांधून व त्यांच्या देखभालीची सुयोग्य व्यवस्था करून ही महत्वाची सुविधा उपलब्ध करून द्यावी व त्यासाठी बजेटमध्ये आवश्यक ती तरतूद व्हावी.
  3. कचरा नियोजन व व्यवस्थापन – वस्ती पातळीवर घंटागाड्या, रहिवासी सोसायट्या व शहर भागात एकत्रितपणे नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था अपुरी आहे. ती पुरेशी करण्यात यावी. याशिवाय, सार्वजनिक कचराकुंड्या पूर्णपणेच काढून टाकल्यामुळे ज्यांचा कचरा उचलण्याची व्यवस्था नाही असे नागरिक रस्त्यावर, नदीपात्रात अथवा रिकाम्या प्लॉट्समध्ये कचरा टाकतात व परिणामी दुर्गंधी, अस्वच्छता व रोगराई यांचा धोका निर्माण होतो. आमची मागणी आहे की कचरा उचलण्याच्या व्यवस्थेसह, किमान दर 500 मीटर्सवर सार्वजनिक कचराकुंड्या उपलब्ध कराव्या व तेथील कचराही नियमितपणे उचलला जाईल अशी व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक ती तरतूद अंदाजपत्रकात करण्यात यावी.
  4. जागोजागी छोट्या बाजारपेठा उपलब्ध करण्याबाबत – गावठाणांमध्ये अनधिकृत बांधकामांमुळे तसेच अनधिकृत दुकाने, फेरीवाले, भाजीवाले इत्यादी व्यावसायिकांमुळे आधीच अरुंद असलेले रस्ते अधिक अरुंद बनत आहेत व अनेक ठिकाणी रहदारीला अडथळा ठरत आहेत. मात्र या व्यावसायिकांना त्यांच्या रोजगारासाठी जागेची व ग्राहकांना जीवनोपयोगी वस्तूंची गरज असल्यामुळे त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. दर 2 कि.मी.च्या परिसरात भाजी, फळे, कटलरी, ग्रोसरी अशा ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारासाठी बांधीव जागा व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात. असेही आढळून आले आहे की काही ठिकाणी, उदा. कोंढवा प्रभाग क्र.27 मध्ये नवीन समाविष्ट गावांमध्ये किमान 5-6 ठिकाणी असे नियोजन करण्यात आलेले आहे, मात्र राजकीय हितसंबंधांमुळे त्यांचा विकास व बांधकाम रखडले आहे. जागा उपलब्ध असूनही तिचा उपयोग होत नाही. आमची विनंती आहे की या जागांवर लवकरात लवकर आवश्यक ते बांधकाम करून विकेंद्रित स्वरुपात छोट्या बाजारांची व्यवस्था केली जावी, जेणेकरून त्या-त्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय करण्यासाठी व ग्राहकांना वस्तू उपलब्ध होण्यासाठी सोय होईल व अतिक्रमणाचा प्रश्न सुटेल. यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यासोबतच ही व्यवस्था कालबद्ध पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण केली जावी अशी मागणी आहे.
  5. वाहनतळ – मध्यवर्ती भागातील महापालिकेच्या आरक्षित जागांमध्ये सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था केली जावी जेणेकरून बेशिस्त पद्धतीने रस्त्यावर वाहने पार्क केली जातात – अनेकदा नाइलाजाने, त्याला आळा बसेल. त्याचप्रमाणे, सर्व प्रमुख रस्त्यांवर पार्किंगसाठी आरक्षित जागेवर स्पष्ट दिसतील असे पट्टे आखले जावेत, जेणेकरून पार्किंग झोन निश्चितपणे कळेल व पादचाऱ्यांची गैरसोय व वाहनचालकांना चुकीच्या जागी वाहन लावल्याबद्दल वाहनचालकांना पडणारा भुर्दंड टळेल.

वरील सर्व कार्यामध्ये रोजगारनिर्मितीही होईल व त्यातून बेरोजगार हाताना काम मिळून त्यांची क्रयशक्तीही वाढेल व पर्यायाने महानगरपालिकेच्या कार्यकक्षेतील नागरी जीवनाची स्थिती सुधारून महापालिकेच्या महसुलातही वाढच होईल. या सर्व मुद्द्यांचा अंदाजपत्रकात प्राधान्याने विचार व्हावा .
शहरातील विकासकार्य व त्याची तरतूद या संदर्भात वॉर्ड स्तरावर नागरिकांच्या सहभागाने प्राधान्यक्रमाची निश्चिती व्हावी

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *