ACB

लाचखोर तलाठ्यावर एसीबीची कारवाई;सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी हजारांची लाच घेताना पकडले रंगेहात,,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारताना तलाठी ‘एसीबी’च्या जाळ्यात,

लाचखोर तलाठ्यावर एसीबीची कारवाई;सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी हजारांची लाच घेताना पकडले रंगेहात,

पुणे : जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर गटाची फोड केल्याची नोंद करून देण्यासाठी तब्बल ५० हजारांची लाच मागत २५ हजारांचा पहिला हप्ता प्रत्यक्ष स्वीकारताना वडगाव मावळ येथील करुज गावच्या तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. वडगाव येथील जुन्या मुंबई पुणे महामार्गावर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली.

सखाराम कुशाबा दगडे (वय ५२, रा. करूज, वडगाव, ता. मावळ) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी ४० वर्षीय शेतकऱ्याने फिर्याद दिली आहे. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडे हा करुज गावचा तलाठी आहे. तक्रारदार शेतकऱ्याने त्यांच्या शेतीच्या गटाची फोड केलेली होती. या फोड केल्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार यांनी दगडे याच्याकडे अर्ज केला होता. या कामाकरिता दगडे याने ५० हजारांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ‘एसीबी’कडे तक्रार दिली. 

‘एसीबी’च्या पथकाने सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक सखाराम दगडे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे शेतीच्या गटाची फोड केल्याची सात-बारा उता-यावर नोंद घेण्यासाठी पंचासमक्ष ५०,०००/- रुपयाची लाच रक्कमेची मागणी केली व आज दि. १८/०३/२०२४ रोजी लोकसेवक सखाराम दगडे यानी तक्रारदार यांचेकडून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून रुपये २५,०००/- (पंचवीस हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध वडगाव मावळ पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक विरनाथ माने तपास करीत आहेत,

लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.

१) हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in

.


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *