गुन्हे शाखा, युनिट २ ची कामगिरी पेट्रोलिंग दरम्यान चेन स्नॅचिंग करणाऱ्या इसमास Unit-2.मोहसीन शेख वा संजय जाधव ने पाठलाग करून आरोपीला पकडले..apcs.in

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

मा. पोलीस आयुक्त, अमितेशकुमार यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे बरिष्ठ पोलीस निरीक्षक, नंदकुमार बिडवई, गुन्हे शाखा, युनिट -2 यांनी यांच्याकडून हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाय योजना केल्या जात आहेत.


दि. 18/03/24 रोजी दुपारी 13.00 वा. सुमारास Unit-2 कडील स्टाफ स्वारगेट ST स्टँड, PMT स्टॉप या गर्दीचे ठिकाणी पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान फिर्यादी महिला नामे मंजुळा नारायण चिल्लाळ वय 59 रा. गुजरवाडी कात्रज पुणे ह्या स्वारगेट पोलीस स्टेशन समोरून घोरपडे पेठ कडे पायी चालत जात असताना पाठीमागून चालत आलेल्या एका इसमाने त्यांचे गळ्यातील अंदाजे 11 ग्रॅम वजनाचे 66,000 ₹ किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून पळून जात असताना गस्तीवरील HC मोहसीन शेख व HC संजय जाधव यांनी त्यास पाठलाग करून थोड्याच अंतरावर दुपारी 13.20 वा. सुमारास पकडले. त्यास PSI पाटोळे यांनी संपूर्ण नाव पत्ता विचारता, त्याने त्याचे नाव बाळू प्रकाश रणपिसे वय-32 व्यवसाय- शिक्षक रा. मु.पो.बोरगाव, डॉ. आंबेडकर नगर, बौद्ध विहार जवळ, ता. माळशिरस जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले.

त्याची पंच व फिर्यादी समक्ष अंगझडती घेता, त्याचे ट्रॅक पँटचे खिशात 1 तुटलेला सोन्याचा मंगळसूत्र मिळून आला तो फिर्यादी यांनी ओळखून त्यांचाच असल्याचे समक्ष सांगितल्याने तो पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे.
सदरबाबत फिर्यादी यांनी खडक पो स्टे CR No 80/2024 IPC 392 प्रमाणे फिर्याद दिल्याने आरोपी बाळू प्रकाश रणपिसे वय-32 रा. मु.पो.बोरगाव, डॉ. आंबेडकर नगर, बौद्ध विहार जवळ, ता. माळशिरस जि. सोलापूर यास वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कार्यवाही करीता मुद्देमालासह खडक पो स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री.अमोल झेंडे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री.सुनील तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार बिडवई, यांचे मार्गदर्शनाखाली PSI राजेंद्र पाटोळे, पो.अंमलदार शंकर नेवसे, संजय जाधव, विनोद चव्हाण, नागनाथ राख व मोहसीन शेख या पथकाने केलेली आहे.

नंदकुमार बिडवई वरिष्ठ पोलीस निरीक्षक,गुन्हे शाखा, युनिट -2
पुणे शहर,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *