हडपसर पोलीस स्टेशन ची कामगिरी पेट्रोलिंग करत असताना मोटारसायकल चोरी करणारे आरोपीला अटक.

ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक -११ /०९ /२०२१ हडपसर पोलीसांकडुन मोटारसायकल चोरी करणा – या सराईत चोरटयाचा पर्दाफाश त्यांचेकडुन एकुण ११ मोटर सायकल ( होन्डा ड्रिम युगा- १. अॅक्टीवा ५ जी १ , पॅशन प्रो – ३ , सुझुकी एक्सेस- १ , बजाज पल्सर -२ , हिरो होन्डा स्प्लेन्डर – ३ , असा एकुण ४,००,००० / – रु कि.चा मुद्देमाल हस्तगत करुन हडपसर पोलीसांनी गुन्हेगारांना केले जेरबंद.

हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनचोरीच्या घटनेत वाढ झाल्याने मा वरिष्ठांच्या आदेशाने व मार्गदर्शानुसार गणेशोत्सव व गुन्हे प्रतिबंध अनुशंगाने दिलेल्या सुचनाप्रमाणे

दिनांक- १०/०९/२०२१ रोजी सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाङ , पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने , पोलीस अमलदार प्रदिप सोनवणे , समीर पांडुळे , शशिकांत नाळे , प्रशांत टोणपे , शाहिद शेख , रियाज शेख निखील पवार , प्रशांत दुधाळ असे मिळुन हडपसर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार प्रशांत टोणपे , शाहिद शेख , रियाज शेख , यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , एक इसम लाल काळ्या रंगाची हिरो होंडा पेंशन प्लस चोरीची दुचाकी गाडी घेवून ग्लायडिंग सेंटर जवळ , तुकाई दर्शन पायथ्यालगत भेकराईनगर याठिकाणी थांबलेला आहे ” वगैरे बातमी मिळालेल्या बातमी बाबत वपोनि श्री . बाळकृष्ण कदम यांना कळविली असता . त्यांनी स्टाफसह जावून खात्री करुन , योग्य ती कारवाई करणेबाबत मुफजल आदेश दिल्याने ,

वर नमुद स्टाफ व पचनामा किटसह ग्लायडिंग सेंटर जवळ , तुकाई दर्शन पायथ्यालगत , भेकराईनगर , पुणे या ठिकाणी गेले असता . मिळालेल्या बातमीप्रमाणे वर्णनाचा इसम सदर याठिकाणी गाडीवर बसलेला मिळुन आला . त्यास स्टाफचे मदतीने पकडून . ताब्यात घेवुन , सदर इसमास त्याचे नाव पत्ता विघाले असता त्याने आपले नाव – यशदिप गोविंद कोडार पय २२ वर्षे , राहणार- शिवशक्ती चौक , गंगानगर , गुरुदत्त कॉलनी , लेन नंबर -८ . फ्लॅट नंबर ७. तिसरा मजला , भेकराईनगर , हडपसर , पुणे मुळ राहणार – चाळ नंबर -१० , त्रिसंगम सोसायटी , नंदादिपनगर , मृणाली रोड , चक्की नाका , कल्याण ईस्ट ठाणे असे असल्याचे सांगितले . सदर इसमाकडे त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या दुचाकी गाडीचे कागदपत्राबाबत विचारले असता , तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला . सदर गाडीचे इंजिन नंबर व चैंसिज नयर वरुन गाडीची पडताळणी करता , सदरील गाडीचा मुळ आर.टी.ओ. क्रमांक- MH12 EC – 8978 असा असल्याचे व सदरील गाडी चोरीधावत हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं .७३५ / २०२१ भा.द.वि. कलम- ३७२ अन्वये गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाल्याने ,

सदर आरोपीथे ताब्यात मिळुन आलेली दुचाकी गाडी . जप्त करण्यात आलेली आहे . सदर आरोपीकडे अधिक तपास करता त्याचेकडे विविध पोलीस स्टेशनकडील खालील गुन्हे उघडकीस आले असुन त्या गुन्हयामधील वाहने जप्त करण्यात आलेले आहे , ०९ वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले असुन त्यांच्या ताब्यातून एकुण ०९ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असुन असा एकुण ४,००,०००/ – रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.व इतर दोन मोटार सायकलथा मालकांचा शोध घेण्याचे काम चालु आहे . तसेच त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत काय याचा शोध घेत आहोत .

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा . नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री . कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे , श्री , बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन , पुणे शहर , श्री . राजु अडागळे , पोनि ( गुन्हे ) श्री . दिगबर शिंदे पोनि ( गुन्हे ) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड , पोलीस उप निरीक्षक सौरभ माने , पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे , गणेश क्षिरसागर , पोलीस नाईक अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , शशिकांत नाळे , सचिन जाधव पोलीस शिपाई शाहीद शेख , रियाज शेख , प्रशांत टाणपे , प्रशांत दुधाळ , निखील पवार , सचिन गोरखे.सुरज कुंभार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे .

( बाळकृष्णा कदम ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक , हडपसर पोलीस स्टेशन , पुणे .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *