तपास पथकाची कामगिरी पेट्रोलींग करत असताना हातभट्टी दारुची वाहतुक करणारे दोन आरोपीला अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ता . ०८/०९ /२०२१ पोलीस स्टेशन – वाकड हातभट्टी दारुची वाहतुक करणारे इसमांना ४९० लिटर गावठी हातभट्टीची दारु व सॅन्ट्रो कारसह ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण २,४८,००० / – किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

( वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी )

तपास पथकाची कामगिरी पेट्रोलींग करत असताना हातभट्टी दारुची वाहतुक करणारे दोन आरोपीला अटक. एकुण २,४८,००० / -रु किंमतीचा मुद्देमाल जप्त.

मा . श्री.कृष्ण प्रकाश साो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड यांनी अवैध दारुविक्री व दारुची वाहतुक करणारे गुन्हेगारांना प्रतिबंध करण्याबाबत सुचना दिल्याने त्या अनुषंगाने डॉ विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकातील सपोनि श्री संतोष पाटील , अभिजीत जाधव , व तपास पथकातील अंमलदार यांनी अवैध्द् दारुची विक्री व वाहतुक करणा – या गुन्हेगारांवर लक्ष ठेवुन त्यांना चेक करुन अवैध दारुधंदयांचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिल्या . त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार राजेंद्र काळे , बाबाजान इनामदार , वंदु गिरे असे वाकड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना राजेंद्र काळे यांना बातमी मिळाली कि , डांगे चौक ते भुमकर चौक जाणारे रोडवर एक सॅण्ट्रो कार मधुन गावठी हातभट्टीची दारुने भरलेले कॅण्डची विक्री करीता वाहतुक करीत जाणार आहे , अशी बातमी मिळालेने पोलीस अंमलदार राजेंद्र काळे , बाबाजान इनामदार , बंदु गिरे हे काळाखड़क झोपडपट्टी येथे रोडवर उभे राहीले बातमीचे प्रमाणे एक सॅण्ट्रो कार काळया खडकाचे दिशेने येताना दिसली लागलीच सदरची कार थांबवुन त्यातील चालक व त्याशेजारी बसलेले इसमास ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारला असता चालकाने स्वतःचे नाव : –

गजानन सुरेश गौरवाड वय २१ वर्षे रा कुंभारवस्ती , लवळे ता.मुळशी जि.पुणे

व सोबतचे इसमाने त्याचे नाव : – विष्णु सुभाष सुळ वय ३३ वर्षे रा.नढे कॉप्लेक्स नढेनगर काळेवाडी पुणे

असे सांगीतले त्यांचे कारची झडती घेतली असता त्यामधुन एकुण १४ प्लॅस्टीक कॅण्ड प्रत्येकी ३५ लिटर मापाचे त्यात एकुण ४९० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु मिळुन आली म्हणुन त्यांना सोबत घेवुन कार व मुद्देमालासह पोलीस स्टेशन येथे हजर केले . केले कारवाईबाबत सपोफो बाबाजान इनामदार यांनी सरकारतर्फे फिर्यादी होवुन फिर्याद दिली आहे . सदरबाबत वाकड पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं .७५४/२०२१ प्रमाणे गुन्हा दाखल असुन , दोन्ही आरोपींना अटक करणेत आली आहे त्यांचेकडुन एकुण ४९ ० लिटरचे १४ प्लॅस्टीक कॅन , सॅन्ट्रो कार नं.एमएच.१२.एएफ .२७ ९५ असा एकुण २,४८,००० / -रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . गुन्हयाचा तपास चालु आहे .

सदरची कारवाई मा . श्री . कृष्णप्रकाश सो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा.डॉ.संजय शिंदे साो , अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड , मा . श्री . आनंद भोईटे साो , पोलीस उप आयुक्त , परि २ , पिंपरी चिंचवड , मा . श्री . श्रीकांत दिसले , सहा . पोलीस आयुक्त साो , वाकड विभाग , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री . विवेक मुगळीकर , वरिष्ठ पोलीस निरिक्षक , श्री . संतोष पाटील , पोलीस निरीक्षक गुन्हे – १ , सपोनि संतोष पाटील , सपोनि अभिजीत जाधव , पोलीस अंमलदार बाबाजान इनामदार , राजेंद्र काळे , वंदु गिरे , अतिश जाधव , कल्पेश पाटील यांनी केली आहे .

( आनंद भोईटे ) पोलीस उपायुक्त परिमंडळ -२ पिंपरी चिंचवड.

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *