पुणे भारती विदयापीठ हॉस्पीटलमधील महिला डॉक्टरांचे रुम मध्ये छुपे कॅमेरे लावणा – या प्रतिष्ठीत डॉक्टर आरोपीस अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CRIME REPORTER RAEES KHAN

दिनांक – १३/०७/२०२१ भारती विदयापीठ पोलीस ठाणे , पुणे भारती विदयापीठ हॉस्पीटलमधील महिला डॉक्टरांचे रुम मध्ये छुपे कॅमेरे लावणा – या प्रतिष्ठीत डॉक्टर आरोपीस अटक

ONLINE PORTAL NEWS

दि .०६ / ०७ / २०२१ रोजी भारती विदयापीठ कॅम्पस , धनकवडी पुणे या ठिकाणातील महिला डॉक्टरांचे राहते रुममध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने बनावट चावीच्या सहाय्याने लॉक उघडून व आतमध्ये प्रवेश करुन रुममधील प्रावेट पार्टचे व्हिडिओ चित्रीकरण करुन त्याचे प्रदर्शन करण्याचे उददेशाने त्यांचे बाथरुम व बेडरुममध्ये छुपे कॅमेरे लावून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने अज्ञात इसमाविरुध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५०९ / २०२१ भा.द.वि कलम ४४३ सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ ( ई ) अन्वये गुन्हा नोंद करुन गुन्हयाचा पुढील तपास

पोलीस निरीक्षक , संगिता यादव हया करत आहेत . सदर गुन्हयाचे अनुषगाने भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकांचे अधिकारी नितीन शिंदे व त्याचा स्टाफ यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपीचा शोध घेत असताना डॉ . सुजित जगताप यांचेवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणले व त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने त्याचे नाव व पत्ता डॉ.सुजित आबाजी जगताप , वय -४२ वर्ष रा सिंहगड रोड , पुणे असे सांगितले व त्यानेच सदरचा छूप्पा कॅमेरा लावल्याचे कबुल केल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे . गुन्हयाचा अधिक तपास चालु असून त्यांची दोन दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे .

सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त , डॉ.संजय शिंदे , मा.पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ०२ , पुणे शहर , श्री.सागर पाटील , मा.सहाय्यक पोलीस आयुक्त , श्रीमती.सुषमा चव्हाण , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.जगन्नाथ कळसकर , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , श्रीमती.संगिता यादव , पोलीस निरीक्षक , श्री . प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक , नितीन शिंदे , पोलीस अंमलदार रविन्द्र भोसले , रविंद्र चिप्पा , जगदिश खेडकर , सचिन पवार , सर्फराज देशमुख , हर्षल शिंदे , अभिजीत जाधव , गणेश शेंडे , राहूल तांबे , विक्रम सावंत , आशिष गायकवाड , योगेश सुळ , सचिन गाडे , निलेश खोमणे , समिर बगशिराज , शिवदत्त गायकवाड , प्रविण सपकाळ , गणेश सुतार , तुळशीराम टेभुर्णे , प्रसाद टापरे व संतोष खताळ यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *