दत्तवाडी पोलीस स्टेशन कडील खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपींना १२ तासात अटक

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CRIME REPORTER RAEES KHAN

दिनांक १३/०७/२०२१ युनिट -३ , गुन्हे शाखा , पुणे शहर . दत्तवाडी पोलीस स्टेशन कडील खुनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपींना १२ तासात अटक

ONLINE PORTAL NEWS

दि .११ / ०३ / २०२१ रोजी १९ / ०० वा.चे सुमारास दत्तवाडी पोलीस स्टेशनचे हदित दांडेकर पुलाजवळ अक्षय किरवे , वय -२८ वर्षे रा.दांडेकर पुल पुणे याचा अंतर्गत वादातून धारदार शस्त्राने खुन झाला होता . सदरबाबत दत्तवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं .१४९ / २०२१ , भा.द.वि.कलम ३०२,१४३,१४४,१४७,१४८,१४ ९ , ५०४ , ५०६ , आर्म अॅक्ट ४ ( २५ ) , महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ३७ ( १ ) सह १३५ , क्रि.लॉ.अ.अॅ.क .७ गुन्हा दाखल असून सदरचे गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपीची माहिती पोहवा २५३६ राजेंद्र मारणे यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत मिळाली . सदर माहितीचे अनुषांगाने गुन्हे शाखा , युनिट -३ स्टाफने अधिक चौकशी केली असता , सदरचा गुन्हयातील पाहिजे आरोपी हे बापुजी बुवा खिंड , देवकरवाडी ता मुळशी जि पुणे येथे थांबले आहेत .

अशी अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे आदेशान्वये लागलीच स्टाफसह , मिळाले माहितीचे ठिकाणी थोडे अलीकडे आडबाजुस थांबुन पहाणी करुन माहिती घेता बातमीतील माहीतीप्रमाणे तेथे चार जण थांबल्याचे दिसल्याने आमची बातमी प्रमाणे खात्री झाल्यांने वरील स्टाफसह त्यास चौहोबाजुने घेराव घालून अचानकपणे त्यांना जागीच पकडुन ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नावे व पत्ते विचारता त्यांनी आपली नावे व पत्ते १ ) निखील बाळु बोत्रे , वय -३० रा .२१० , नवी पेठ , तारांगण सोसायटी , पुणे . २ ) सुरज संजय बोत्रे , वय -२ ९ रा .२१० , नवी पेठ , तारांगण सोसायटी , पुणे ३ ) प्रविण गणपत गाडे , वय -३१ , रा .१३० , दांडेकर पुल , शंतीनगर पुणे ४ ) अमरदिप मुकुंद भालेराव , वय २८ रा .१३० , दांडेकर पुल , शंतीनगर पुणे . असे असल्याचे त्यांनी सांगीतले.त्याचे विरुध्द दाखल गुन्ह्यांबाबत त्यांचेकडे चौकशी करता त्यांने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याबाबत दत्तवाडी पो.स्टे येथे संपर्क करुन दाखल गुन्ह्यांची माहिती घेता नमुद आरोपी विरुध्द दत्तवाडी पोलीस स्टेशन गुरन .१४ ९ / २०२१ भा.द.वि.कलम ३०२,१४३,१४४,१४७,१४८,१४ ९ , ५०४,५०६ , आर्म अॅक्ट ४ ( २५ ) , महा पोलीस अधि कायदा कलम ३७ ( १ ) सह १३५ , क्रि.लॉ.अ.अॅ.क .७ प्रमाणे गुन्हा दाखल असून , सदर गुन्ह्यातील आरोपी यांना गुन्हे शाखा युनिट ३ , चे टिमने आरोपींचा शोध घेऊन , त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन , बारा तासाचे आत सदरचा गुन्हा उघडकिस आणलेला आहे .

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त , श्री.अशोक मोराळे , गुन्हे शाखा पुणे , मा.पोलीस उप आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , मा.सहा.पोलीस आयुक्त , श्री.सुरेंद्रकुमार देशमुख , गुन्हे शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक , अनिल शेवाळे , पोलीस उप – निरीक्षक दत्तात्रय काळे , पोलीस अंमलदार राजेंद्र मारणे , संतोष क्षिरसागर , दिपक मते , महेश निंबाळकर , एकनाथ कंधारे , दिपक क्षिरसागर , विल्सन डिसोझा सोनम नेवसे यांचे पथकाने केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *