सराईत मोटार सायकल चोरीचा आरोपी जेलबंद , चाकण पोलीसांची कारवाई
ACS POLICE CRIME SQUAD

दिनांक २७/०७/२०२१ सराईत मोटार सायकल चोरीचा आरोपी जेलबंद , चोरीच्या पाच मोटार सायकल हस्तगत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत चाकण पोलीसांची कारवाई
CRIME REPORTER RAEES KHAN
चाकण पोलीस स्टेशन हददीतील मोटार सायकल चोरीचे गुन्हयांना आळा घालण्यासाठी मा . पोलीस आयुक्त सो , पिंपरी चिंचवड श्री . कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . अशोक राजपुत यांनी गुन्हे शोध पथकाला मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांचे घटनास्थळ परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले . त्यानुसार चाकण पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाने मोटार सायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या परीसरातील सीसीटीव्ही कॅमे – यांचे फुटेज तपासले असता रेकॉर्डवरील मोटार सायकल चोर अशोक मधुकर सोनवणे रा . राळेगण थेरपाळ ता . पारनेर जि . अहमदनगर याने चाकण पोलीस स्टेशन हददीत मोटार सायकल चोरीचे गुन्हे केलेले असल्याचे निष्पन्न झाले होते . चाकण पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथक सदर आरोपीची माहिती काढत असतांना दिनांक १८/०७/२०२१ रोजी मोटार सायकल चोर अशोक सोनवणे हा नाणेकरवाडी हददीत चोरीची मोटार सायकल विक्रीचे उददेशाने येणार असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने नाणेकरवाडी गावचे हददीत बी.के. पार्क येथे सापळा रचुन आरोपी अशोक मधुकर सोनवणे वय ४१ वर्षे रा . राळेगण थेरपाळ ता . पारनेर जि . अहमदनगर यास हिरो स्प्लेंडर प्रो कंपनीची मोटार सायकल नं . MH 14 ET 8871 हिचेसह शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्याने सदरची मोटार सायकल चोरी केलेली असल्याची कबुली दिली अधिक तपास करता सदर मोटार सायकल चोरी बाबत चाकण पोलीस स्टेशन येथे गुरनं ८२३/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले . सदर गुन्हयात आरोपी अशोक सोनवणे यास अटक करून त्याची पोलीस कोठडी रिमांड घेतली व त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने चोरी केलेल्या आणखी चार मोटार सायकल काढुन दिलेल्या आहेत . त्याचेकडुन सुमारे २,५०,000 / – रू . चा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे . आरोपी अशोक सोनवणे याचेकडुन जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकली व उघडकीस आलेले गुन्हे खालील प्रमाणे . अ.नं. पोलीस स्टेशन गुरनं व कलम जप्त केलेली मोटार सायकल चाकण पो.स्टे . ८२३/२०२१ भादविक ३७९ हिरो पॅशन प्रो मोटार सायकल नं . MH 14 ET 8871 चाकण पो.स्टे ७४७/२०२१ भादविक ३७९ हिरो पैशन प्रो मोटार सायकल नं . MH 12 FT 2587 चाकण पो.स्टे ८१९ / २०२१ भादविक ३७९ हिरो स्लेंडर मोटार सायकल नं . MH 14 HN 2983 चाकण पो.स्टे ८४६/२०२१ भादविक ३७९ हिरो स्प्लेंडर मोटार सायकल नं . MH 14DV6043 भोसरी पो.स्टे ४५४/२०२१ भादविक ३७९ हिरो सिडी डिलक्स मोटार सायकल नं . MH 14 B2 6378 सदर आरोपी अशोक मधुकर सोनवणे वय ४१ वर्षे रा . राळेगण थेरपाळ ता . पारनेर जि . अहमदनगर हा मोटार सायकल चोरीमध्ये सराईत असुन त्यांचेवर यापुर्वी चाकण पोलीस ठाणे येथे १ ) गु.र.नं. १२३६/२०१६ भा.द. वि . कलम ३७९ , ३४२ ) गु.र.नं. १४५२ / २०१ ९ भा.द.वि. कलम ३७९. ३ ) गु.र.नं. १२८/२०२० भा.द.वि.कलम ३७९ याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहवा संदिप सोनवणे हे करीत आहेत . सदरची कारवाई मा . पोलीस आयुक्त , श्री . कृष्ण प्रकाश साहेब , अपर पोलीस आयुक्त , श्री . रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ -१ श्री . मंचक इप्पर , सहा . पोलीस आयुक्त , प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अशोक राजपूत तसेच पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) अनिल देवरे , सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड , पोसई विजय जगदाळे , सफौ सुरेश हिंगे , पोहवा संदिप सोनवणे , झनकर , पोना हनुमंत कांबळे , मनोज साबळे , अनिल गोरड , पोकॉ / नितीन गुंजाळ , निखील वर्षे , अशोक दिवटे , प्रदिप राळे , विलास कांदे , मपोकॉ / सुप्रिया गायकवाड यांनी केलेली आहे . 9 २ ३ 8 ५ ( मंचक इप्पर ) पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१ , पिंपरी चिंचवड
ACS POLICE CRIME SQUAD
ONLINE PORTAL NEWS
CRIME REPORTER RAEES KHAN
9881888008