४,१४,८५० / – किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन अंमली पदार्थ विक्री करणा – या नायजेरियन इसमास रंगेहाथ चतुःश्रृंगी पो.ठाणे हद्दीतुन शिताफीने पकडुन अटक

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

दिनांक – २८/०७/२०२१ अंमली पदार्थ विरोधी पथक क्र .१ गुन्हे शाखा , पुणे शहर रु . ४,१४,८५० / – किंमतीचा २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन अंमली पदार्थ विक्री करणा – या नायजेरियन इसमास रंगेहाथ चतुःश्रृंगी पो.ठाणे हद्दीतुन शिताफीने पकडुन अटक ,

CRIME REPORTER RAEES KHAN

गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई दि .२७ / ०७ / २०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा कडील पथक खडकी चर्तुःश्रृंगी पो स्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना , मिल्ट्री इंटिलिजीन्स सदन कमांड यांना मिळालेले माहितीवरुन बाणेर पुणे येथील सं नं ११०/१११ मित्रनगर कॉलनी शॉप नंबर २ राजयोग सोसायटी समोर , अन्नापुर्णा हॉटेल चे समोरील सार्वजनिक रोडवर इसम नामे शुएब तौफिक ओलाबी , ( SHUAIB TAOFIQ OWOLABI ) वय ४० वर्षे , रा.झु व्हिलेज वाशी , देवी ज्योती सोसायटी फ्लॅट नंबर ३०२ , वाशी नवी मुंबई मुळ रा . नायजेरिया हा बेकायदेशीररित्या त्याचे कब्जात विक्रीसाठी २० ग्रॅम १६० मिलीग्रॅम कोकेन कि रु ४,०३२०० / -रोख रुपये ६५० / – दोन मोबाईल फोन कि रु ११,००० / – एक नायजेरिया देशाचा पासपोर्ट , रिकाम्या प्लास्टिक पारदर्शक पिशव्या एकुण २२ व निळ्या रंगाचा टिक्सोटेप चे एकुण २२ तुकडे असा ऐवज व कोकेन हा अंमली पदार्थ त्याचे ताब्यात अनाधिकाराने बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द चर्तुःशृंगी पो स्टे येथे सहा पो उप निरी सुजित सुनिल वाडेकर यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीची दिनांक ३०/०७/२०२१ रोजीपर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली असुन , पुढील तपास पोलीस उप निरीक्षक डी एल चव्हाण अंमली पदार्थ विरोधी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत .

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता , मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त , श्री.अशोक मोराळे , गुन्हे शाखा पुणे , मा.पोलीस उप आयुक्त , श्री.श्रीनिवास घाडगे , गुन्हे शाखा पुणे शहर , मा.सहा.पोलीस आयुक्त , श्री.सुरेंद्रकुमार देशमुख , गुन्हे शाखा पुणे शहर , यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक -१ , गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , पोलीस अंमलदार प्रविण शिर्के , सुजित वाडेकर , संदिप जाधव , राहुल जोशी , प्रविण उत्तेकर , नितीन जाधव , पांडुरंग पवार , संदेश काकडे यांनी केली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD

ONLINE PORTAL NEWS

CRIME REPORTER RAEES KHAN

9881888008

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *